मोस्को - रशियामधील श्रीमंताच्या यादीत ११ व्या स्थानी असलेल्या व्यक्तीचा मुलगा अलेक्जेंडर फ्रीडमॅन हा युवक सध्या सोशल मीडियात चर्चेत आला आहे. वडील अब्जाधीश असूनही मुलगा अलेक्जेंडर हा मोस्को शहराच्या बाहेर २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. या फ्लॅटचं भाडं महिन्याला ५०० डॉलर इतकं आहे. त्याशिवाय अलेक्जेंडर कामाला जाण्यासाठी मेट्रो ट्रेनने प्रवास करतो.
ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार अलेक्झांडरचे वडील मिखाईल फ्रीडमॅन यांचे १३.१७ अब्ज डॉलर्सचे संपत्तीचे मालक आहे. तरीही त्यांचा १९ वर्षाचा मुलगा अलेक्जेंडर हा स्वत:च्या कमाईनेच खाणं, राहणं, खरेदी करणं करतो. गेल्या वर्षी अलेक्जेंडरने लंडन येथील हायस्कूलमधून पदवी प्राप्त करुन मोस्कोला परतला आहे. त्यानी 5 महिन्यांपूर्वी 5 कर्मचार्यांसह एसएफ डेव्हलपमेंटचा आपला व्यवसाय 405,000 डॉलर्स सुरू केला. त्याशिवाय मॉस्कोमधील रेस्टॉरंट्समध्ये हुक्का उत्पादनांचे वितरण करण्याचा आणखी एक व्यवसाय सुरू केला. पुढच्या महिन्यात ऑनलाइन मार्केटिंग फर्मची सुरुवात करणार आहे.
अलेक्जेंडरने त्याच्या वडिलांकडून कोणतीही मदत घेत नसला तरी तो मिखाईल फ्रिडमॅनचा मुलगा असल्याचा फायदा त्याला नक्कीच होतो. त्याच्या वितरण कंपन्या इतर लोकांव्यतिरिक्त वडिलांच्या किरकोळ दुकानांत बरीच उत्पादने वितरीत करतात. इतकचं नाही तर किरकोळ दुकानातील मॅनेजरही मोठ्या मालकाचा मुलगा आहे म्हणून अलेक्जेंडरवर अंधविश्वास ठेवत नाही.
याबाबत अलेक्जेंडर म्हणतो की, आमच्या देशात व्यवसाय आणि राजकारणात खूप गुंतागुंत आहे, माझ्या वडिलांनी सांगितलं की, आपली संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करणार आहे. त्यामुळे मला कोणाचाही वारसा मिळणार नाही हे समजून मी जगलो हे माझं भाग्य आहे.