अल्जायर्स- परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये, मुलांना कोणत्याही प्रकारे बाहेरुन मदत मिळू नये यासाठी धडपडणारी परिक्षा मंडळं आपण पाहिली असतील. तसेच या शाळेतून त्या शाळेत जाणाऱ्या भरारी पथकांच्या बातम्याही आपल्या कानावर आलेल्या असतात. पण एका देशाने कॉपी थांबविण्यासाठी संपूर्ण देशातील इंटरनेटच बंद केलं. अल्जेरियामध्ये हायस्कूल डिप्लोमाच्या परिक्षा सुरु झाल्यावर मुलांना कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉपी करता येऊ नये यासाठी संपूर्ण देशाचे इंटरनेटच बंद करण्यात आले. इंटरनेट, मोबाइल फोन तसेच इतर उपकरणांचा वापर करुन कॉपी केली जाते तसेच व्हॉटसअॅपचाही वापर करुन पेपर, उत्तरे पसरवली जातात. त्यामुळे या समस्येला थांबविण्यासाठी अल्जेरियाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:40 AM