शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर 50 वर्षांपूर्व सापडला होता एलियन, नासानं चुकून मारला? वैज्ञानिकाचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:58 IST

"हे जीव अस्तित्वात असले तरी लँडरने त्यांना प्रयोगांद्वारे आधीच मारले असावे. कारण, या प्रयोगाने कुठल्याही प्रकारचे सूक्ष्मजंतू मरतात."

नासाने साधारणपणे 50 वर्षांपूर्वी नकळत मंगळावर जीवन असल्याचा शोध लावला असावा आणि ते काय आहे? हे समजण्यापूर्वी, त्यानी त्याला मारून टाकले, असा दावा एका वैज्ञानिकाने केला आहे. मात्र या दाव्यावर तज्ज्ञांचे एक मत नाही. हा दावा म्हणजे, एक दूरवरची कल्पना मानली जाते. टेक्निकल युनिव्हर्सिटी बर्लिनचे खगोलशस्त्रज्ञ डर्क शुल्ज-मकूच यांनी एका लेखात म्हटले आहे की, 1976 मध्ये मंगळावर उतरल्याने नासाच्या वायकिंग लँडर्सने मंळळ ग्रहावरील पाषाणात लपलेल्या छोट्या, शुष्क प्रतिरोधक जिवनाचा नमूना घेतला असेल.

त्यांनी लिहिले आहे की, हे जीव अस्तित्वात असले तरी लँडरने त्यांना प्रयोगांद्वारे आधीच मारले असावे. कारण, या प्रयोगाने कुठल्याही प्रकारचे सूक्ष्मजंतू मरतात. ते म्हणाले, 'हा सल्ला काही लोकांना आवडणार नाही. असेच सूक्ष्म जीव पृथ्वीवर आढळतात आणि काल्पनिकदृष्ट्या ते लाल ग्रहवरही राहू शकतात. त्यामुळे हे नाकारले जाऊ शकत नाही.' नासाने मंगळावर वायकिंग नावाचे दोन लँडर उतरवले होते. त्यांच्याकडे त्यांची स्वतःची एक लॅब होती.

या लँडर्सनी केले चार प्रयोग - या लँडर्सनी मंगळावर चार प्रयोग केले. यात मातीचे नमुने घेण्यात आले. मात्र यांच्या प्रयोगांचा रिझल्ट अतिशय भ्रामक होता. तेव्हापासूनच काही वैज्ञानिक यासंदर्भात द्विधामनःस्थितीत आहेत. काही प्रयोग असे आहेत, जे मगळावर जीवन असण्यासंदर्भातील विचारांचे समर्थन करतात. काही गॅसच्या छोटे-मोठ्या बदलांनी चयापचय (Metabolism) होत असल्याचे संकेत दिले. हा जीवन असण्यासंदर्भातील मोठा संकेत आहे. 

प्रयोगादरम्यान क्लोरीनयुक्त सेंद्रिय संयुगांचे काही अंश देखील र्आढळून आले. मात्र त्यावेळी वैज्ञानिकांचा विश्वास होता की, ही संयुगे पृथ्वीच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांमधून आली आहेत. मात्र, यानंतरच्या ही संयुगे मंगळावर नैसर्गिकरित्या आढळतात, असे लँडर्स आणि रोव्हर्सने सिद्ध केले.

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रहAmericaअमेरिका