परग्रहवासी म्हणजेच एलियन्स अस्तित्वात आहेत की नाहीत याबाबाबत बऱ्याचदा चर्चा झड़तात. कोणी फोटो, कोणी व्हिडिओ पोस्ट करत आकाशात यान दिसल्याचे दावे केले जातात. आता इस्त्रायलच्या संशोधकाने मोठा खळबळजनक दावा केला आहे. एलियन्स पृथ्वीवर लपले असून ब्रम्हांडातील एलियन्स हे अमेरिका आणि इस्त्रायलसोबत संपर्कही असल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायलचे माजी अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख हैम इशेद यांनी हा दावा केला आहे. त्यांनी एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा करत ते पृथ्वीवर लपल्याचेही म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची घोषणा करणार होते, मात्र त्यांना एलियन्सनीच रोखल्याचे इशेद यांनी म्हटले आहे. एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे.
हे परग्रहवासी अमेरिकी एजंटांसोबत मिळून ब्रम्हांडाची माहिती शोधू इच्छित आहेत. मानवजाती एलियन्सचे अस्तित्व स्वीकारण्यास तयार नसल्याने याची घोषणा करू नये असे एलियन्सना सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प याची घोषणा करणार होते, मात्र त्यांना फेडरेशनच्या एलिअन्सनी वाट पाहण्यास सांगितले. लोकांमध्ये गोंधळ, गडबड होईल ते नको असल्याचे या एलियन्सनी अमेरिकेला सांगितले. पृथ्वीवरील मनुष्याने आधी मनाची तयारी करावी, समजूतदार व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही इशेद म्हणाले.
माझ्य़ाकडे गमावण्यासारखे काहीच नाही....इशेद यांनी सांगितले की, मी जिथे जिथे ही माहिती घेऊन गेलो तिथे मला वेडा ठरविण्यात आले. माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. मला माझी डिग्री, पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विश्वविद्यापीठांनी मला गौरविले आहे. इशेद यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पृथ्वीला अणुयुद्धाच्या धोक्यापासून एलियन्सनीच वाचविल्याचा दावा केला आहे.
इशेद हे इस्त्रायलच्या संस्थेत तीस वर्षे कार्यरत होते. ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना स्थानिक मीडियाने 'इस्त्रायलच्या सॅटेलाइट कार्यक्रमाचा जनक' म्हटले होते. ते 2011 मध्ये निवृत्त झाले होते.
एलियन्सने सही देखील केली...मंगळ ग्रहावरील खोलगट भागात एलियन्सचा अड्डा आहे. तेथे अमेरिकेचे प्रतिनिधी आणि एलियन्स राहतात. आपल्यासोबतही एलिन्सही करार केले आहेत. यावर त्यांची सही आहे. त्यांना ब्रम्हांडाच्या शोधासाठी मदत हवी आहे, असा दावाही इशेद यांनी केला आहे.