शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

"लष्करप्रमुखांसह सर्वांचा लोकशाहीवर विश्वास"; पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यास इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 9:28 AM

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांची ही टिप्पणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर चार दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आलेली आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर निर्माण झालेले राजकीय संकट व बिघडती कायदा-व्यवस्था पाहता देशात लष्करी राजवट लागू करण्याच्या शक्यतेचा पाकिस्तानी लष्कराने इन्कार केला आहे. लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीरसह सर्व लष्कराचा लोकशाहीवर विश्वास आहे, असेही यावेळी सांगितले.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांची ही टिप्पणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर चार दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आलेली आहे. 

या कालावधीत रावळपिंडीमध्ये जनरल मुख्यालयासह लष्करी प्रतिष्ठानांनाही लक्ष्य करण्यात आले होते. चौधरी यांनी सांगितले की, देशात लष्करी राजवट लागू करण्याचा प्रश्नच नाही. लष्कराचे ऐक्य अतूट आहे व लष्कर देशाचे स्थैर्य व सुरक्षेसाठी काम करीत राहील.  पाकिस्तानी लष्करात दुही माजवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वात लष्कर एकजूट राहील. 

माझ्या अटकेसाठी लष्करप्रमुखच जबाबदार - इम्रान खान- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अखेर शनिवारी सकाळी आपल्या लाहोर येथील निवासस्थानी दाखल झाले. अनेक प्रकरणांमध्ये जामीन मिळाला असला तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना न्यायालयाच्या परिसरातच थांबावे लागले होते. दरम्यान, आपल्या अटकेसाठी लष्करप्रमुख असीम मुनीर हेच जबाबदार आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी केला.

- इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोन आठवड्यांसाठी जामीन देताना सोमवारपर्यंत कोणत्याही प्रकरणात अटक करण्यावर स्थगिती दिली. 

- कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात नेलेल्या ७० वर्षीय इम्रान खान यांना उच्च न्यायालयाच्या तीन वेगवेगळ्या पीठांनी दिलासा दिला होता. इम्रान खान लाहोर येथील जमां पार्कमधील निवासस्थानी दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 

- सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीवर अडून बसलेले खान यांच्यावर देशभरात १२० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानPoliticsराजकारण