ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि.1- भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम न पाळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेशही जारी करण्यात आला आहे.
आणखी बातम्या -
पेमरा म्हणजेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने सर्व चॅनेल्सना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास 15 ऑक्टोबरपासून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अनधिकृत वाहिन्या बंद करण्यासाठी कारवाई हाती घेण्यात आली, असं पेमराने जाहीर केलं आहे. मात्र ही कारवाई केवळ भारतीय वाहिन्या बंद करण्यासाठीच हाती घेण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे.