दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे. तसेच दहशतवादविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन करत मोदींनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी संयुक्त सभेच्या 74व्या सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला असल्यामुळेच आम्ही दहशतवादविरोधात जगाला जागरुक करण्याचे काम करत असल्याचे देखील मोदींनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या जनतेने सर्वाधिक मत देऊन मला व माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा मताने जिंकून दिल्याचे त्यांनी यावेळी सभेत बोलून दाखवले.
तसेच जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले आहे. संयुक्त राष्ट्र संघात मनोगत व्यक्त करण्याची संधी विशेष आहे, कारण संपूर्ण जग महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करणार असल्याचे देखील मोदींनी सांगितले. जगाने २०३० पर्यंत टी.बी. पूर्णपणे नष्ट करण्याचे ठरवले आहे. पण भारताने २०२५ मध्येच टी.बी. मुक्त करण्याचे उद्देश ठेवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.