जेरुसलेम : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर मर्यादा घालणारे वादग्रस्त विधेयक इस्रायलच्या संसदेने या आठवड्यात मंजूर केल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, महत्त्वाच्या पदावरील राजीनामे, लष्कराचा त्याग, संप असे हत्यार उपसले आहे.
विधेयक मंजूर झाल्यानंतर संतप्त आंदोलक रस्त्यावर उतरल्याने सोमवारी इस्रायली शेअर्स गडगडले. सुमारे ७० टक्के इस्रायली स्टार्टअप्स देशाबाहेर जाण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहेत, असे स्थानिक सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले.
दैनिकांचे पहिले पान पूर्ण काळे...
सरकारविरोधात जनता उतरली असतानाच देशातील प्रमुख दैनिकांनी सरकारविरोधात मंगळवारी पहिलं पान पूर्णत: काळ्या शाईत छापत निषेध केला. या दैनिकांनी काळ्या पानावर “इस्रायली लोकशाहीसाठी काळा दिवस” इतकाच मजकूर पानाच्या शेवटी छापला होता.