बेल्जियममधील आल्स्तो शहरात एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे, त्या महिलेच्या शरीरात एकाचवेळी दोन कोरोना व्हेरिएंट असल्याच समोर आलं आहे. संबंधित महिला एकाचवेळी शरीरात दोन कोरोना व्हेरिएंट असलेली जगातील पहिली रुग्ण होती. डॉक्टरांना त्या महिलेच्या शरीरात कोरोनाचे 'अल्फा' आणि 'बीटा' व्हेरिएंट आढळले होते. या दोन्ही व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं "व्हेरिएंट ऑफ कन्सर्न" जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिला रुग्णालयात आली होती. तिचा श्वास व्यवस्थित सुरू होता, ऑक्सीजन लेव्हलही 94% पेक्षा जास्त होती. पण, तिला नीट चालता येत नव्हतं, चालताना ती कोसळू लागली. डॉक्टरांनी तिची चाचणी केल्यानंतर तिच्या शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंट असल्याचं समोर आलं. काही तासानंतर त्या महिलेचं फुफ्फुस अचानक खराब होण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले, पण पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दोन व्हेरिएंटचे इंफेक्शन असलेली जगातील पहिलीच रुग्ण होती. वैज्ञानिक याला कोरोनाचा नवीन प्रकार म्हणत आहेत.
भारताला जास्त सतर्क राहण्याची गरजमागच्या शनिवारी यूरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रो-बायोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीजमध्ये वैज्ञानिकांनी या नवीन प्रकारावर चर्चा केली. या डबल व्हेरिएंटबाबत जगाला सतर्क करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी मांडले आहे. डबल व्हेरिएंटचे हे प्रकरण भारतासाठी जास्त महत्वाचे आहे. कारण आपल्या देशात डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्ब्डा आणि कप्पासारखे कोरोनाचे व्हेरिएंट आधीपासूनच अॅक्टीव्ह आहेत. तसेच, नवीन व्हेरिएंटची माहिती घेण्यासाठी लागणाऱ्या जीनोम सीक्वेंसिंगमध्ये भारत खूप मागे आहे. त्यामुळे भारताला या नवीन प्रकारावर जास्त लक्ष्य देण्याची गरज आहे.
दोन व्यक्तींकडून आले इंफेक्शनयूरोपियन काँग्रेस ऑफ इंफेक्शियस डिजीजमध्ये या प्रकरणावर रिपोर्ट बनवणाऱ्या डॉ. ऐनी वेंकीरबर्गेन सांगतात की, महिलेच्या शरीरात अल्फा आणि बीटा व्हेरिएंट आढळले होते. या दोन्ही व्हेरिएंटचा बेल्जियममध्ये संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून महिलेला इंफेक्शन झाल्याचे नाकारता येत नाही. तसेच, ऐनी यांच्यासह इतर अभ्यसकांच्या मते, जीनोम सीक्वेंसिंग वाढवल्यानंतर अशाप्रकारचे अजून रुग्ण आढळून येतील.