लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तान मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुस्सेन यांना लंडनमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली. देशातून हद्दपार करण्यात आल्यामुळे हुस्सेन सध्या इंग्लडमध्ये वास्तव्यास आहेत. हुस्सेन यांनी पाकिस्तानविरोधात केलेल्या भाषणांबाबत त्यांना ही अटक झाली आहे, असे स्कॉटलंड यार्डने म्हटले.
2016मध्ये केलेल्या एका भाषणामुळे त्यांना अटक केल्याची चर्चा आहे. त्या भाषणात हुस्सेन यांनी पाकिस्तानविरोधात आगपाखड केली होती. पाकिस्तान हा देश जगासाठी कॅन्सर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असल्याचीही त्यांनी टीका केली होती.