चीनच्या हेरगिरी करणाऱ्या फुग्याने अमेरिकेतील अनेक संवेदनशील लष्करी तळांची गुप्त माहिती मिळली आहे. हे रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अमेरिकेच्या दोन विद्यमान आणि एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे.
या तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन या फुग्याला नियंत्रित करत होता. हा फुगा अनेक संवेदनशील ठिकाणांवरून अनेक वेळा गेला. तो रिअल टाइम माहिती चीनला पाठवत होते. चीनने जी गोपनीय माहिती मिळवली आहे, त्यातील अधिकांश माहिती ही इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सच्या माध्यमाने मिळवली आहे. ही वेपन्स सिस्टिम्स अथवा बेसच्या कर्मचाऱ्यांच्या कम्युनिकेशन्सने मिळवली जाऊ शकते. यात फोटोंची आवश्यकता नसते.
मोंटानामध्येही दिसला होता फुगा - चीनचा हा हेरगिरी करणारा फुगा बॅलिस्टिक मिसाइल साइट मोंटाना वरूनही उडताना दिसला होता. मात्र स्पष्टीकरण देताना हा कुठल्याही प्रकारचा हेरगिरी करणारा फुगा नाही. ते एक सिव्हिलियन प्लेन आहे. जे संशोधनाच्या हेतूने पाठविण्यात आले होते, असे चीनने म्हटले होते. मात्र, चीनने अपेक्षेपेक्षाही अधिक माहिती मिळवल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
या फुग्यासंदर्भात बोलताना चीनने वारंवार म्हटले आहे की, हा फुगा चुकीच्या मार्गावर गेला होता. अमेरिकी हवाई दलाने फेब्रुवारी महिन्यात एफ-22 च्या सहाय्याने हा फुगा नष्ट केला होता. यानंतर, या फुग्याने इंटेलिजन्स सिग्नल मिळविल्याचे बायडेन प्रशासनने म्हटले होते.