न्यूयॉर्क : माणूस वगळता अन्य कोणत्याही प्राण्याने स्वत:च स्वत:चे छायाचित्र (सेल्फी)काढले, तरी त्या छायाचित्रचा स्वामित्वहक्क त्या प्राण्याकडे असत नाही, असे अमेरिकेच्या कॉपीराईट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेतील कॉपीराईटसंबंधीचे नियम व त्यांचे प्रत्यक्षातील प्रचालन याविषयीची अद्ययावत माहिती कॉपीराईट नियामक कार्यालयाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. त्यात कोणत्या प्रकारची बुद्धिसंपदा कॉपीराईटचे संरक्षण मिळण्यास पात्र ठरत नाही, याची काही उदाहरणो दिली गेली आहेत. त्यामध्ये माकडाने काढलेले छायाचित्र आणि हत्तीने काढलेले भित्तीचित्र यांचा समावेश आहे.
कॉपीराईट प्रशासनाने स्वामित्वहक्काच्या वादात दिलेला हा औपचारिक निवाडा नाही तर ते केवळ स्पष्टीकरण आहे, तरी त्यामुळे एका माकडाने काढलेल्या ‘सेल्फी’च्या स्वामित्वहक्कावरून अमेरिकेत उद्भवलेल्या वादाचा फैसला होण्यास त्यामुळे दिशानिर्देशन मिळू शकणार आहे.
डेव्हिड स्लेटर हे अमेरिकन निसर्ग छायाचित्रकार व ‘विकिपीडिया’ या लोकप्रिय संकेतस्थळाची मालक असलेली ‘विकिमीडिया’ ही कंपनी यांच्यात माकडाने काढलेल्या अशाच एका ‘सेल्फी’वरून अलीकडेच वाद झाला होता व स्लेटर यांनी ‘विकिमीडिया’ला कोर्टात खेचण्याची तयारी चालविली होती.
‘विकिपीडिया’ने माकडाचे ते ‘सेल्फी’ आपल्या वेबसाईटवर टाकले आणि जगभरातील हजारो लोकांनी ते डाऊनलोड करून घेतल्याने त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. त्या ‘सेल्फी’चा स्वामित्वहक्क आपल्याकडे आहे. ‘विकिपीडिया’ने विनापरवाना त्याचा वापर करून आपल्या कॉपीराईटचा भंग केला. शिवाय त्यांच्या विनामूल्य डाऊनलोडमुळे आपले व्यावसायिक उत्पन्नही बुडाले, असा आरोप करून स्लेटर यांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली.
‘विकिपीडिया’ने मात्र मकाक्यू माकडाचे ते ‘सेल्फी’ काढून टाकण्यास नकार दिला व त्याचे समर्थन करणारा पुढील संदेश आपल्या वेबसाईटर टाकला. हे छायाचित्र त्या माकडाने घेतलेले असल्याने त्याचा स्वामित्वहक्क स्लेटर यांच्याकडे नव्हे तर त्या माकडाकडे आहे. ही कलाकृती मानवेतर प्राण्याची बुद्धिसंपदा असल्याने ते कोणत्याही कॉपीराईटशिवाय कोणालाही मुक्तपणो वापरण्यासाठी उपलब्ध
आहे.
आता कॉपीराईट प्रशासनाने केलेल्या खुलाशाने स्लेटर यांच्या केसला बळकटी मिळाली आहे.
(वृत्तंसस्था)
4डेव्हिड सेल्टर 2क्11 मध्ये निसर्ग छायाचित्रणासाठी इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर गेले होते. तेथे त्यांनी विलुप्ततेच्या मार्गावर असलेल्या मकाक्यू प्रजातीच्या माकडांचे छायाचित्रण केले.
4हे छायाचित्रण सुरू असताना यापैकी एका माकडाने स्लेटर यांचा कॅमेरा पळविला व बराच वेळ इतस्तत: माकडचेष्टा करून त्याने कॅमेरा टाकून दिला. पळविलेला तो व्हिडिओ कॅमेरा सुरू होता. त्यामुळे मकाक्यू माकडाकडून नकळत शेकडो छायाचित्रे टिपली गेली. त्यापैकी काही अप्रतिम होती आणि त्यातच त्या माकडाकडून टिपले गेलेले स्वत:चेच एक छायाचित्रही (सेल्फी)ही होते.