शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

मॉस्कोची अप्रतिम वाहतूक व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 5:25 AM

मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमिनीपासून वर.

- रणजीत दळवीमहानगर कोणतेही असो, कुठल्याही देशातले, त्याचा विकास, त्याची प्रगती, भरभराट होण्यासाठी जे प्रमुख आणि प्रभावी साधन आवश्यक असते, ते म्हणजे तेथील वाहतूक व्यवस्था. थोडक्यात त्याला ‘मास अँड रॅपिड पब्लिक ट्रान्सपोर्ट’ असे संबोधले जाते. बहुतांसाठी गतिमान प्रवासाचे साधन, दुसरे काय? रशियाची राजधानी मॉस्कोविषयी सांगावयाचे, तर त्यांच्याकडे मेट्रो सुरू झाली १९३५ साली! त्या आधी लंडनची ‘द ट्युब’ १८६३ मध्ये! रशियाने ब्रिटिशांच्या मदतीने ती सुरुवातीला उभारली. तसे आमचे राज्यकर्ते ब्रिटिशांचेही आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनीच तर आपल्याला मुंबईची लोकल व्यवस्था आणि देशभरातील रेल्वेचे जाळे नाही का दिले?मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमिनीपासून वर. कमालीचा वक्तशीरपणा हे वैशिष्ट्य आणि स्वच्छता म्हणाल, तर कागदाचा कपटादेखील दिसत नाहीआणि महत्त्वाचे म्हणजे शिस्त. कोठेही उगाचच धावपळ, इतरांना त्रास, आरडओरडा असला प्रकारच नाही. आत पाहावे, तर बहुतेकांच्या हातात पुस्तके आणि नव्या पिढीच्या हातात मोबाइल. त्यातच ते मशगुल! पण त्या मोबाइलवर तुम्हाला बरेच काही करता येते. अगदी नवोदित, नवख्याला समजावा, असा नकाशा, कारण विस्तारलेल्या मेट्रोचे जाळे फारच गुंतागुंतीचे, चक्क १३ लाइन, शहराच्या वेगवेगळ्या भागांना जोडतात. बाकी वेळापत्रक, भाडेसूची आणि प्रवाशांना अन्य उपयुक्त माहिती. अगदी स्थानिकांनाही याची आवश्यकता भासते. कारण ही व्यवस्थाच तशी विस्तीर्ण आहे.मॉस्कोची मेट्रो व्यवस्था चांगलीच सुरक्षित आहे. अर्थात, याला अपवाद हे असतातच. १९७७, २०००, २००४, २०१० साली बॉम्बस्फोटांनी मेट्रो हादरली. शंभराच्या वर माणसे दगावली. आमच्याकडे लोकलमुळे वर्षाला ३ ते ४ हजार मृत्यू होतात, यातुलनेत हे फारच कमी. आजपर्यंत एक - दोन आगी आणि एकदाच ‘डीरेलमेन्ट’. तेव्हा मेट्रो किती सुरक्षित आहे, हे समजून यावे. प्रतिदिनी ७५ लाख प्रवासी ही संख्याही तशी मोठी. गर्दीच्या वेळी साधारण १० लाख प्रवासी एका वेळी असतात.रशिया हा कष्टकऱ्यांचा देश, तेव्हा त्यांना आवश्यक असणारी प्रवासाची सुविधा सरकार देते. अगदी प्रचंड नुकसान सोसून आणि आम्ही? बेस्ट, एस.टी. महामंडळ, सारे काही तोट्यात! केव्हाएकदा खासगीकरण करतो आणि झटकून टाकतो नागरी परिवहनाची जबाबदारी! पब्लिक ट्रान्सपोर्ट ही सरकारचीच जबाबदारी आणि ती कशी पार पाडावी, याचे शिक्षण द्यावे आमच्या सरकारी बाबू आणि राजकारण्यांना एकदाचे! जशी त्यांची तशी जनतेचीही जबाबदारी नाही का? वक्तशीरपणा, स्वच्छता, सुरक्षितता, उत्तम प्रशासन आपल्याकडील कोलकाता, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू अशा महानगरातील मेट्रोमध्ये अवश्य पाहावयास मिळते,हेही खरे! नाही म्हटले, तरी मुंबईचीलोकल व्यवस्था त्या महानगरीच्याव्यापार - उदिमाला भरभराटीला कारणीभूत ठरले हेही खरे. 

टॅग्स :Metroमेट्रोnewsबातम्या