अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:44 PM2022-04-06T18:44:35+5:302022-04-06T18:47:20+5:30

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे.

america again reacted on india buying russian oil amid russia ukraine war | अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

googlenewsNext

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिकारशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. रशियन तेल किंवा इतर रशियन वस्तूंच्या आयातीला गती देणे भारताच्या हिताचे नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे. 

"रशियन ऊर्जा आणि इतर वस्तूंच्या आयातीला गती देणे किंवा वाढवणे हे भारताच्या हिताचे आहे असे आम्हाला वाटत नाही", असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी म्हटले आहे. रशिया भारताला सवलतीच्या दरात इंधन तेल पुरवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया भारताला प्रति बॅरल ३५ डॉलरपर्यंत सूट देत आहे. रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे, रशियाला डॉलरमध्ये व्यापार करणे शक्य नाही, म्हणून दोन्ही देश पेमेंटच्या इतर पद्धतींवर बोलणी करत आहेत. 

अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, दलीप सिंग हे बुधवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आणि भारतावर रशियन तेल खरेदी करू नये यासाठी दबाव आणला होता. यावेळी त्यांनी भारताने रशियाशी संबंध वाढवू नयेत असे आवाहन केले होते. 'द हिंदू'मधील वृत्तानुसार, दलीप सिंह यांनी भारत दौऱ्यावर असताना भारताने रशियाकडून कमी दराने तेल खरेदी केल्यास अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयानेही भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जेन साकी म्हणाल्या, 'प्रत्येक देशाने अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचे पालन केले पाहिजे आणि जे आम्ही जगभरात लागू केले आहे.'

अमेरिका भारत आणि चीनवर दबाव आणत आहे जेणेकरून ते या देशांना रशियन इंधन खरेदी करण्यापासून रोखू शकतील का? असा सवाल जेन साकी यांना विचारण्यात आला होता. 'मला असे म्हणायचे आहे की ऊर्जा आयातीच्या पेमेंटवर कोणतेही बंधन नाही. सर्व देश आपापले निर्णय घेत आहेत. रशियाकडून इंधन खरेदीवर आम्ही इतर अनेक देशांनी निर्बंध लादले असतील पण बाकीचे देश स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत', असे त्या म्हणाल्या. मात्र दलीप सिंग यांच्या भारत भेटीचा संदर्भ देत साकी यांनी रशियासोबत व्यापार वाढवणे हे भारताच्या हिताचे नाही असेही म्हटले आहे. 

मोदी सरकारही ठाम
गेल्या आठवड्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव्ह भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा भारतासोबत रशियाकडून तेल खरेदीसाठी देयक पद्धतींवर चर्चा झाली होती. ते म्हणाले होते की निर्बंधामुळे पेमेंटच्या इतर पद्धतींवर भारताशी चर्चा सुरू आहे. नुकतेच भारताने रशियन तेलाची खरेदी वाढवल्याचेही वृत्त आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही भारतासाठी आपले सुरक्षा हित सर्वतोपरी महत्वाचे आहे. जर इंधन उपलब्ध असेल तर भारत ते खरेदी करेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे रशियाकडून इंधन खरेदीच्या बाबतीत मोदी सरकारही ठाम आहे. 

Web Title: america again reacted on india buying russian oil amid russia ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.