पेइचिंग : लडाखमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत सरकारने सीमेवर तैनात असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार दोन्ही देशांतील करारात बदल करण्याची पूर्ण सूट दिली आहे. याचा अर्थ, परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी गोळी चालवणे आवश्यकच आहे, असे अधिकाऱ्यांना वाटले, तर ते क्षणाचाही विलंब न करता जवानांना तसा आदेश देऊ शकतात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळेच चीनला मिर्ची झोंबली आहे.
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!
चीन मारतो 1962च्या युद्धाच्या फुशारक्या - चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल. मग, कुणाची मदतही भारताच्या कामी येणार नाही.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील - चीनी माध्यमाने खुली धमकी देत लिहिले आहे, चिनी सैनिकंसोबत कराराचे नियम बदलने आणि गोळी चलवण्याची परवानगी दिल्याने भारताच्याच सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. भारतीय लष्कराने गोळीबार केलाच, तर चिनी सैनिकही याचे उत्तर देतील. भारताने सीमेवर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तर चीनही यात सहभागी होईल. मग भलेही चीन रणनीतीकदृष्ट्या घेरला गेलेला असेल, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
1996मध्ये दोन्ही देशांत करार -भारत आणि चीन यांच्यात 1996 मध्ये करार झाला आहे, की एलएसीच्या दोन किलोमिटर परिसरात दोन्ही देश गोळी चालवणार नाहीत अथवा स्फोटकांसह गस्तही घालणार नाहीत. तसेच गस्त घालतानाही दोन्ही देशांच्या सैनिकांकडे असलेल्या बंदुकांचे बॅरल जमिनीच्या दिशेने असेल.
गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले