ह्युस्टन : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात प्रेषित मोहंमद यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्यंगचित्र स्पर्धेच्या ठिकाणी दोन जणांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी गोळ्या घालून त्यांना ठार केले. रविवारी रात्री ही घटना घडली. या दोघांची मृतदेहे गारलॅण्ड शहरातील कुर्टीस कुलवेल सेंटरबाहेर अनेक तास पडून होती. अद्याप त्यांची ओळख सांगण्यात आलेली नाही. हल्लेखोर कारमधून आले होते. या कारमध्ये स्फोटके असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारची तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदुकधाऱ्यांनी घटनास्थळी येणे व निशस्त्र सुरक्षा अधिकाऱ्यावर गोळीबार करण्याच्या काही मिनीटे आधीच हा वादग्रस्त कार्यक्रम संपन्न झाला होता. हल्लेखोरांनी सुरक्षा अधिकाऱ्यावर गोळीबार करताच पोलिसांनी प्रत्युत्तर देत दोघांना ठार केले. टेक्सासचे अधिकारी हल्ल्याचे कारण व उद्देशांचा शोध घेत आहेत, असे गव्हर्नर ग्रेग अबोट यांनी सांगितले.
अमेरिकेत व्यंगचित्र स्पर्धास्थळी दोन हल्लेखोरांचा खात्मा
By admin | Published: May 04, 2015 11:13 PM