शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 8:48 AM

Coronavirus in America : अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) कोरोना व्हायरसचा (Coronavirus In America) प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतरही पुन्हा एकदा येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत.

ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना संसर्ग झालेले किंवा संशयित रुग्णांना 15 राज्यांमध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त आयसीयू (ICU) बेडची आवश्यकता आहे. कोलोरॅडो, मिनेसोटा आणि मिशिगनमध्ये आतापर्यंत आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अनुक्रमे 41, 37 आणि 34 टक्के आहे.

मिशिगनमध्ये प्रति व्यक्ती सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध जारी करण्यात आलेले नाहीत. राज्यातील प्रशासकीय विभाग प्रत्येकाला मास्क घालण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे प्राध्यापक अली मोकदाद म्हणाले, "आमचे बरेच डॉक्टर सतत रुग्णालयात असतात. आयसीयू, इमर्जन्सी आणि रुग्णालयात राहून अशा व्यक्तीचा मृत्यू होताना पाहणे सोपे नाही, ज्याचे अद्याप लसीकरण झाले नाही."

इतर रुग्णांना मिळत नाहीत बेडकोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची गरज असल्याने इतर आजारांनी त्रस्त रुग्णांना बेड मिळत नाहीत. जे त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढ नोंदवली जात आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे ही कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे समोर येत आहे. थंडीमुळे लोक घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसींपासून संरक्षण कमी होत आहे, त्यामुळे या हिवाळ्यात कोरोना महामारीच्या आणखी एका मोठ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अमेरिकन आरोग्य संस्था पुन्हा एकदा लोकांना लस संरक्षण देऊ इच्छित आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी अँटी-कोरोना लसींचा बूस्टर डोस देण्यासाठी परवानगी दिली आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस