वॉशिंग्टन- अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचं कारण देत अमेरिका दीर्घ काळापासून बाहेर पडण्याच्या धमक्या देत होता. 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेच्या दूत असलेल्या निकी हेली यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली आहे. निकी हेली म्हणाल्या, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यानंच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत आहोत. अमेरिका तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे. या परिषदेत अमेरिकेला आताच दीड वर्ष पूर्ण झालं होतं.
अमेरिकेची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 5:30 AM