वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी, आपली पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत, माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अमेरिकेच्या इतिहासात मेलानिया सर्वात सुंदर फर्स्ट लेडी आहे. मात्र, 4 वर्षांत त्यांना कोणत्याही मोठ्या मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले नाही.
मिशेल ओबामांना 12 मॅगझीनने दिली संधी -डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, यापूर्वी बराक ओबामा (Barack Obama) यांच्या कार्यकाळात मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना 8 वर्षांत 12 मोठ्या मॅगझीन्सनी अनेक वेळा आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले.
माध्यमांवर भेदभावाचा आरोप -डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमांवर भेदभावाचा आरोप केला असून माझ्या कार्यकाळात मेलानिया ट्रम्प यांना कुठल्याही मॅगझीनने कव्हर पेजवर जागा दिली नाही. तसेच कसल्या प्रकारची संधीही दिली नाही. मात्र, आता कार्यकाळ संपत असताना माध्यमे मेलानिया यांना महान म्हणत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या आरोपावर अनेक मॅगझीन्सनी प्रतिक्रिया दिली असून हे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मॉडेल होत्या मेलानिया ट्रम्प -डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मेलानिया या एक मॉडेल होत्या. लग्नानंतर मेलानिया यांना ख्रिश्चन डायर वेडिंग ड्रेसमध्ये व्होगच्या मुखपृष्ठावर झळकण्याची संधी मिळाली होती.
कोण आहेत मेलेनिया ट्रम्प?मॉडेल ते फर्स्ट लेडी झालेल्या मेलेनिया यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. मेलेनिया या लहान देशातून आल्या असल्या तरी त्यांची मॉडेल म्हणून कामगिरी वाखण्याजोगी होती. मेलेनिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये यूगोस्लाव्हिया येथे झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मेलानिया यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्यांना इंग्रेजी, स्लोवेनियाई, फ्रेन्च, सर्बियन, इटालियन आणि जर्मन भाषा अवगत आहेत. कोरोना लस नाताळचा चमत्कार -नाताळच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प व फर्स्ट लेडी मेलानिया यांनी कोरोना लस हा नाताळचा चमत्कार असल्याचे म्हटले होते. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून लोकांना शुभेच्छा दिला. आम्ही सर्व संशोधक, कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. या सर्वांनी हे कठीण काम शक्य करून दाखवले. खरेतर हा नाताळचा चमत्कार आहे. मेलानिया म्हणाल्या, यंदाचा नाताळ वेगळा आहे. आपण सगळे महामारीला तोंड देत आहोत.