वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले 'व्हाईट हाऊस' अनेकदा चर्चेत असते. आताही आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये व्हाईट हाऊसची चर्चा सुरू झाली आहे. पण, ही चर्चा आता एका वेगळ्याच कारणामुळे होत आहे. व्हाइट हाऊस चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, याचे 'टॉयलेट' आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की, व्हाईट हाऊसच्या टॉयलेटमध्ये असे काय आहे, की ज्याची आंतरराष्ट्रीय मीडियात चर्चा सुरू झाली आहे. बरं, हे टॉयलेट लक्झरी असल्याने याची चर्चा नाही, तर याची चर्चा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृत्यामुळे टॉयलेट चर्चेत असून, ट्रम्प यांच्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
नेमकं काय झालं?काही मीडिया हाऊसने व्हाईट हाऊसबद्दल एक खुलासा केला आहे. यात डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर असताना त्यांनी काही महत्वाची कागदपत्रे फाडून टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी इतके पेपर फ्लॅश केले की, त्यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेट जाम झाले. ही माहिती समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले असून सर्व दावे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
पुस्तकात दावान्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हेबरमनने तिच्या आगामी पुस्तक 'कॉन्फिडन्स मॅन'मध्ये व्हाईट हाऊसबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकात असे म्हटले आहे की व्हाईट हाऊसच्या कर्मचार्यांनी सांगितले की, ट्रम्प अनेकदा टॉयलेटमध्ये कागदपत्रे टाक असे. या कागदपत्रांमुळे अनेकदा टॉयलेट जाम व्हायचे. असे मानले जाते की, ती कागदपत्रे ट्रम्प यांनी फ्लश केली होती. स्व च्छता करताना टॉयलेटमध्ये अनेक छापील कागदपत्र सापडल्यानंतर ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.