काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये जो बायडेन यांना बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर येत्या २० जानेवारीला म्हणजेच उद्या ते आणि कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर औपचारिकरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागणार आहे. निवडणुकांच्या निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेच्या परिसरात हिंसाचार घडवला होता. याच हिंसाचाराचा उल्लेख फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या संदेशात केला. लोकांनी प्रत्येक बाबतीत उत्साही असावं. परंतु हिसाचाराचा आधार कधीही घेतला जाऊ नये, असं त्या म्हणाल्या. मेलेनिया ट्रम्प यांनी व्हिडीओद्वारे आपला निरोपाचा संदेश अमेरिकेतील नागरिकांना दिला. "आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी उत्साही असलं पाहिजे. परंतु हिंसाचार हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हिंसाचार कधीही योग्य ठरवला जाऊ शकत नाही," असं मेलेनिया ट्रम्प म्हणाल्या. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा संदेश जारी केला आहे.
निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,"हिंसाचाराचा आधार..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 11:20 AM
काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडवला होता हिंसाचार
ठळक मुद्देट्रम्प समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संसद परिसरात घडवला होता हिंसाचारउद्या जो बायडेन घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ