लोकमत न्यूज नेटवर्क: अमेरिकेतही आता ओमायक्रॉन बस्तान बसवू लागला आहे. अलीकडेच अमेरिकेत नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये ७३ टक्के बाधित ओमायक्रॉनचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाताळात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी अमेरिकेत जोर धरू लागली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने अमेरिका सरकारची चिंता वाढली आहे.
बाधितांची संख्या या ठिकाणी अधिक
- वॉशिंग्टन, ओरेगॉन, इडाहो आणि अलास्का
- याशिवाय वायव्येकडील राज्ये, दक्षिण आणि मध्य पश्चिमेकडील राज्यांमध्येही ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे.
- संपूर्ण अमेरिकेत गेल्या आठवड्यात साडेसहा लाखांहून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे.
विविध ठिकाणी निर्बंध
- ओमायक्रॉन बाधितांची संख्या लक्षात घेता, अमेरिकेतील विविध शहरांमध्ये निर्बंध लागू केले जाऊ लागले आहेत.
- निर्बंध लावण्यात येत असले तरी अध्यक्ष बायडेन संपूर्ण अमेरिकेत लॉकडाऊन जारी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते.
न्यूयॉर्कमध्ये रोजची रुग्णसंख्या दुप्पट
आधी : ३२००आता : ७२००
रोज जवळपास दीड लाख रुग्ण
२० डिसेंबर १,४३,५३०१९ डिसेंबर १,३०,८१६१८ डिसेंबर १,५२,२५६१७ डिसेंबर १,६७,११९१६ डिसेंबर १,५८,८९३१५ डिसेंबर १,४०,८९१