अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या नवीन लाटेचा परिणाम शाळा, कामाची ठिकाणे आणि स्थानिक सरकारवर पुन्हा एकदा झाला आहे. तज्ज्ञांनी पुन्हा एकदा COVID-19 उद्रेकांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या ताज्या आकडेवारीनुसार, 12 ऑगस्ट रोजी संपलेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत हॉस्पिटलायझेशनच्या संख्येत 24% वाढ झाली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, सांडपाण्यावर नजर ठेवल्याने असे दिसून आले आहे की अमेरिकेतील पश्चिम आणि ईशान्येमध्ये कोविड संसर्गामध्ये अलीकडेच वाढ झाली आहे. प्रीस्कूल, उन्हाळी शिबिरे आणि यूएसमधील कार्यालयांमध्ये उद्रेक वाढला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, कोरोना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अजूनही तुलनेने कमी आहे आणि बहुतेक आजारी लोकांना सर्दी किंवा फ्लूच्या तुलनेत सौम्य लक्षणे जाणवत आहेत.
या महिन्यात नॅशविलमध्ये अनेक लोकांना कोविडची लागण झाली आहे, ज्यामध्ये नगर परिषद सदस्य, शहर कर्मचारी आणि रिपोर्टर यांचा समावेश आहे. अलिकडच्या दिवसात विद्यार्थी शाळेत परतले असल्याने, बहुतेक प्रशासकांनी सूचित केले आहे की ते मास्क आणि टेस्टचा समावेश असलेल्या कठोर नियमांकडे परत जाण्याची योजना नाही. अधिकारी सहसा पालकांना त्यांची मुले आजारी असल्यास घरी ठेवण्यास सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हवा नाही तर आता पाण्यातही सापडला कोरोना; WHO ने दिला धोक्याचा इशारा
WHO ने कोरोना व्हायरसबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. गेल्या एका महिन्यात, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. अलीकडेच WHO ने 17 ऑगस्ट रोजी कोरोनाच्य़ा BA.2.86 व्ह्रेरिएंटला निगराणीखाली ठेवलं होतं. युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या भागांतून या व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. या व्हेरिएंटमधून मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नसली तरी BA.2.86 कोरोना व्हेरिएंट थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये पाण्यात सापडला आहेत. हा व्हेरिएंट देखरेखीखाली आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या कोरोनामुळे फारशी हानी होत नाही, मात्र पाण्यात आढळल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे.