वॉशिंग्टन - पाकिस्तानमधून दहशती कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर लगाम घालणे गरजेचे आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसह लष्कराच्या दहशतवाद्यांविरोधात खटला भरायला हवा असा सल्ला अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या दक्षिण-मध्य आशियाचे प्रमुख अॅलिस वेल्स यांनी दिला आहे. चार दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे त्यांनी स्वागतही केले आहे.
पाकिस्तानला काळ्या यादीत टाकावे की नाही या संदर्भात वित्तीयकृती दलाच्या (एफएटीएफ) निर्णयापूर्वीच अमेरिकेने हे विधान केले आहे. पाकिस्तानच्या भवितव्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीचा वापर करण्यास रोखायला हवं असं पंतप्रधान इम्रान खआन यांनी म्हटलं आहे. त्याचं स्वागत करताना वेल्य यांनी आपल्या ट्विटमध्ये हाफिज सईदसह सर्व दहशतवाद्यांविरोधात खटला चालवला जात आहे. हे पाहण्याचा दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना हक्क आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये पाकिस्तानला एफएटीएफने काळ्या यादीत टाकलं होतं. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविण्यासह अन्य धोकांच्या मुकाबला करणे आणि संबंधित देशांविरुद्ध कारवाई करणारी एफएटीएफ ही संस्था आहे. पाकिस्तानला ऑक्टोबर 2019 पर्यंत कारवाई करण्याची योजना देण्यात आली होती. ही योजना अमलात न आणल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. पाकिस्तानने योजनेनुरुप काय पावले उचलली त्याबाबत पॅरिस येथे एफएटीएफच्या 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत आढावा घेऊन घेतला जाणार आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा घेऊन गेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर केला जाऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीद सईद यांचे पोस्टर्स लाहोरमध्ये लागले होते. एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं नाटक करायचं तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना खतपाणी घालयाचं हे उद्योग करणाऱ्या पाकचा बुरखा या पोस्टर्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे. लाहोर शहरात लागलेल्या या पोस्टर्सवरून हाफिज सईदसोबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होतं.