America Help Ukraine: अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत; युद्धात शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी दिले ३५० दशलक्ष डॉलर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 07:50 PM2022-02-26T19:50:52+5:302022-02-26T19:55:06+5:30
Russia Ukraine War updates: युक्रेनमध्ये आता सामान्य नागरिकही युद्धासाठी तयार झाले आहेत. युक्रेनच्या रस्त्यांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यांना शस्त्रे पुरविली जात आहेत. अशातच त्यांना आणखी शस्त्रे, बंदुकांची गरज लागणार आहे.
रशियाला गेले महिनाभर आव्हाने देणाऱ्या अमेरिकेने हल्ल्या झाल्यानंतर युक्रेनच्या मदतीला जाण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिकेची पुरती नाचक्की झाली होती. रशियाने कोणी मध्ये आल्यास इतिहास बदलून ठेवण्याचा इशारा दिला होता. यामुळे युद्धात उडी घ्यावी तरी पंचाईत नाही नाही घ्यावी तरी पंचाईत अशी अवस्था अमेरिका व नाटोची झाली होती. त्यातच आज अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता. यावर त्यांनी आम्हाला शस्त्रास्त्रे द्या अशी मागणी केली होती. यावर आता अमेरिकेने मोठी मदत देऊ केली आहे.
Nato Response Force: नाटोने पहिल्यांदाच खतरनाक युनिट केले अॅक्टिव्हेट; कीवमध्ये उतरवण्याची शक्यता
अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी मोठी मदत केली आहे. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेनच्या दिशेने रवाना झाला आहे. अशातच युक्रेनला रशियासोबत लढण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रांची तसेच दारुगोळ्याची गरज भासणार आहे. त्यातच युक्रेनचे प्रचंड नुकसान रशियाने केले आहे. यामुळे ही शस्त्रे विकत घेण्यासाठी युक्रेनला अमेरिकेने ३५० दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ केली आहे.
युक्रेनमध्ये आता सामान्य नागरिकही युद्धासाठी तयार झाले आहेत. युक्रेनच्या रस्त्यांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यांना शस्त्रे पुरविली जात आहेत. अशातच त्यांना आणखी शस्त्रे, बंदुकांची गरज लागणार आहे. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली आहेत त्यात ही वाढीव मदत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जाहीर केली आहे.