कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामालाही सुरूवात केली. तसंच बायडेन यांनी निवडणुकांपूर्वी दिलेला शब्दही पाळला.बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय मागे घेतले. निवडणुकांदरम्यान बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या अमेरिकेतील मागण्यांवर बायडेन यांनी स्वाक्षरी केली.
बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे
By जयदीप दाभोळकर | Updated: January 21, 2021 09:13 IST
बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात
बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे
ठळक मुद्देपदभार स्वीकारताच बायडेन यांनी केली कामाला सुरूवातपहिल्याच दिवशी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास बायडेन यांची सुरूवात