America Nurse News: अमेरिकेत राहणाऱ्या एका नर्सने आपल्या काळ्या कारनाम्यांनी सर्वांनाच हादरवून सोडलं. या नर्समुळे दोन हॉस्पिटलमधील साधारण १० रूग्णांचा जीव धोक्यात आहे. जॅक्लीन ब्रियूस्टर (Jacqueline Brewster) नावाच्या नर्सवर शक्तीशाली पेन किलर औषधांच्या बाटल्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.
'डेली मेल' च्या रिपोर्टनुसार, नर्स जॅक्लीनवर आरोप आहे की, तिने दोन हॉस्पिटल्समध्ये काम करतेवेळी कॅन्सरच्या रूग्णांना वेदना कमी करण्यासाठी दिलं जाणारं पेनकिलर हायड्रोमोफोनच्या बाटल्यांसोबत छेडछाड केली. तिने बाटल्यांमधून औषध काढून त्याजागी वेगळं सॉल्यूशन भरलं. नंतर हे इंजेक्शन रूग्णांना लावण्यात आले.
फारच पॉवरफुल आहे हायड्रोमोफोन
रूग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांना दिलं जाणारं हायड्रोमोफोन एक असं पॉवरफुल पेनकिलर आहे ज्याचा वापर हेरोइन ड्रगप्रमाणे केला जातो. रिपोर्टनुसार, याचा प्रभाव इतका जास्त असतो की, याची लतही लागू शकते. हेच कारण आहे की, हॉस्पिटल्समध्ये हे फार काळजीपूर्वक ठेवले जातात. अमेरिकेतील दोन हॉस्पिटल्सवर आरोप आहे की, ट्रॅव्हल नर्स ब्रियूस्टरने हायड्रोमोफोनच्या बाटल्यांमधून लपून औषध काढलं.
एकाने नोकरीहून काढलं
५२ वर्षीय ट्रॅवल नर्स जॅक्लीन ब्रियूस्टर अमेरिकेच्या केंटकीमध्ये राहते. ट्रॅवल नर्सचा अर्थ होतो की अशी नर्स जी काही काळासाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सेवा देते. जॅक्लीनने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये टेनेसीच्या जॉनसन मेडिकल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली होती. यादरम्यान जेव्हा तिच्या एका सहकारीला पेनकिलरच्या बॉटलचं सील फुटलेलं दिलं तेव्हा पहिलं प्रकरण समोर आलं. त्यानंतर हॉस्पिटलने जॅक्लीनला नोकरीहून काढलं.
दुसऱ्या ठिकाणी मिळालं काम
एका हॉस्पिटलमधून काढून टाकल्यानंतर जॅक्लीनला वेस्ट वर्जीनियाच्या रॅले जनरल हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. इथेही तिने तिचे कारनामे सुरू ठेवले. पण हॉस्पिटलच्या स्टाफला जशी याची भनक लागली हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेलं. त्यानंतर जॅक्लीनला नोकरीहून काढलं गेलं. नर्सने तिच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी सध्या आरोपी नर्सला अटक केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.