संतोष ठाकूर (वॉशिंग्टन, न्यूयॉर्कहून परतल्यानंतर)
नवी दिल्ली : एका देशात वा शहरात किती भाषा बोलल्या जाऊ शकतात. कुणाला खरे वाटणार नाही की, एका देशात वा शहरात लोक ८०० पेक्षा अधिक भाषा बोलतात; पण अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात लोक जवळपास ८०० पेक्षा अधिक भाषा बोलतात. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्येही जवळपास ३०० पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. भाषेच्या मुद्यावर येथे वाद होत नाही. या भाषा अमेरिकी शहरांची संस्कृती आणि ओळख यांना नवे परिमाण देत आहेत.
वॉशिंग्टनस्थित कॅपोटल बिल्डिंगमध्ये अमेरिका सरकारचे विविध मंत्रालय आहेत. येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आमची विविधता हीच आमची ओळख आहे. न्यूयॉर्क हे जगातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे जगातील प्रत्येक देशाचा निवासी आपल्याला भेटेन. येथील विद्यापीठात जवळपास १६५ भाषा बोलल्या जातात.
येथील विद्यार्थी हू याने सांगितले की, मी चीनहून येथे शिक्षणासाठी आलो आहे. इंग्रजीत संवाद होत असलेल्या या कॉलेजमध्ये आपण आपले म्हणणे मांडू शकू का? असे मला वाटत होते; पण येथे आल्यानंतर ही भीती दूर झाली. येथे चिनी भाषा मैंडरीनही बोलली जाते.येथील एका प्रोफेसरने सांगितले की, येथे जवळपास ६० टक्के घरांत त्यांची आपली भाषा बोलली जाते, तर ४० टक्के घरांत इंग्रजी बोलली जाते. ज्या विदेशी भाषा सर्वाधिक प्रचलित आहेत त्यात स्पेनिश, चिनी, फ्रेंच या आहेत, तर हिंदी बोलणारेही येथे अनेक जण दिसून येतात.व्यक्तींचे स्वातंत्र्य श्रेष्ठ आहेअमेरिकेत विविधता असली तरी हेही वास्तव आहे की, अमेरिकी समाज गोरे आणि काळे यांच्यात विभागलेला आहे. आफ्रिकन अमेरिकन किंवा काळे अमेरिकन व गोरे अमेरिकन यांचे वेगवेगळे चर्च आहेत. दोन्हीही प्रकारचे लोक रविवारी चर्चमध्ये जातात.हा प्रकार विविधतेतील एकता या संकल्पनेला अनुसरून आहे काय? असा सवाल केला असता एक आफ्रिकन अमेरिकन रिचर्ड म्हणतात की, हा काही प्रश्न असू शकत नाही. उलट अशा प्रश्नांचे उत्तरच आहे. आम्ही निश्चितच वेगळ्या चर्चमध्ये जातो; पण आमच्यात संघर्ष नाही.याचे कारण असे की, लोक आपल्यासारख्या लोकांमध्येच राहू इच्छितात. जेव्हा स्वेच्छेने दोन्ही प्रकारचे लोक आपापल्या चर्चमध्ये जातात, तर विविधतेत एकतेचे हे मोठे उदाहरण आहे. अमेरिका हा संदेश देते की, व्यक्तीचे स्वातंत्र्य श्रेष्ठ आहे.