वॉशिंग्टन - नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंक यांनी कोरोनासाठी तयार केलेली प्रायोगिक लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. तसेच ज्या आरोग्य स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली त्या सर्व स्वयंसेवकांमधील रोग प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत 'लसीवर ग्रेट न्यूज' असे म्हटले आहे. सुरवातीच्या टप्प्यात ही लस 45 आरोग्य स्वयंसेवकांना देण्यात आली होती.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी केलेल्या या ट्विटमध्ये केवळ, 'लसीवर ग्रेट न्यूज' एवढेच लीहीले आहे. यासंदर्भात त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही. त्यांनी मॉडर्नाच्याच लसीसंदर्भात हे ट्विट केले असावे, असा अंदाज लावला जात आहे. मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते.
आता कंपनी पुढील ट्रायलची तयारी करत आहे. 27 जुलैपासून या लसीची पुढची चाचणी सुरू होणार आहे. तीस हजार लोकांवर हे परिक्षण केले जाणार आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून माणसांना वाचवू शकते. मंगळवारी 45 लोकांवर टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट तपासण्यात आले. त्यात असे दिसून आले की स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीजची वाढ झाली होती.
मॉडर्ना इंकने तयार केलेल्या या व्हॅक्सीनचे नाव mRNA-1273 असे आहे. ती पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. चाचणीसाठी ही लस दोनदा दिली जाणार आहे. त्यामध्ये एका महिन्याचे अंतर असेल. या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. लस घेतल्यानंतर फ्लू आणि ताप यांसारखी लक्षणं जाणवत आहेत. लस दिल्यानंतर अनेकांना थंडी वाजणे, ताप येणं आणि पोटदुखी, ही सर्वसामान्य समस्या असते.
या लसीची पुढची चाचणी 30 हजार लोकांवर करण्यात येणार आहे. ही चाचणी सर्वात मोठ्या स्तरावरील मानवी चाचण्यांपैकी एक असणार आहे. याशिवाय ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटी, जॉनसन एंड जॉनसन आणि भारतातील भारत बायोटेक या कंपनीचे क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसेच फायजर कंपनीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा