अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत. यातून फारच इंटरेस्टिंग अशी आकडेवारी समोर आली आहे. यातून समोर आलं की, ज्यो बायडन आणि त्यांच्या पतीचं २०२० मध्ये जेवढं उत्पन्न होतं, कमला हॅरिस आणि त्यांच्या पतीने त्यापेक्षा जास्त टॅक्स भरला आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी जिल यांचं २०२० मध्ये एकूण उत्पन्न केवळ ६,०७,३३६ डॉलर इतकं होतं. हे २०१९ च्या तुलनेत ९,८५,२२३ डॉलरपेक्षा फारच कमी होतं. या जोडीने मिळून २०२० मध्ये एकूण १,५७,४१४ डॉलर इतका टॅक्स भरला आहे.
दुसरीकडे उप-राष्ट्राध्यक्षा कमा हॅरिस आणि त्यांचे पती डाउग एमहॉफ यांचं २०२० मध्ये एकूण १६९५२२५ डॉलर इतकं उत्पन्न होतं. यानुसार त्यांनी एकूण ६,२१८९३ डॉलर इतका टॅक्स भरला. याप्रकारे हॅरिस कपलने जेवढा टॅक्स दिला, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीचं उत्पन्न त्यापेक्षा कमीच आहे.
दरम्यान, अमेरिकन कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांना परिवाराची आर्थिक माहिती सार्वजनिक करायची असते. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीने ३०,७०४ डॉलरची रक्कम चॅरिटीमध्ये दिली आहे. ही रक्कम त्यांच्या उत्पन्नाच्या ५.१ टक्के भाग आहे.
यासोबतच दोन्ही परिवारांनी वेगवेगळ्या राज्यांमध्येही काही इन्कम टॅक्स दिले आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीने डेलावेअरमध्ये २८,७९४ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे. तसेच त्यांच्या पत्नीने व्हर्जिनीयामद्येही ४४३ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे.
त्याचप्रमाणे कमला हॅरिस आणि त्यांच्या पतीने कॅलिफोर्नियामध्ये साधारण १२५,००४ इन्कम टॅक्स भरला आहे. हॅरिस यांचे पती डाउग एमहॉफ यांनी कोलंबियामध्ये ५६९९७ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे. या कपलने चॅरिटीसाठी २७,००६ डॉलर दिले आहेत.