वॉशिग्टन :भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर मध्यस्थी करण्यासाठी अमेरिका तयार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, 'आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही कळवले आहे, की त्यांची इच्छा असेल, तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.'
सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लद्दाखमधेय भारत आणि चिनी सैनेय समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनकडून सातत्याने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविण्याच्या आणि बेस तयार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात भारतही पूर्णपणे तयार आहे.
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यांनी मंगळवारी लडाख मुद्द्यावर संपूर्ण अहवाल मागवला. तसेच तिन्ही दलाच्या प्रमुखांना यावर पर्याय सुचवायला सांगितले. याबैठकीत राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोभालदेखील उपस्थित होते. यावेळी सैन्य प्रमुख आणि सीडीएस यांच्याकडून यासंदर्भात ब्ल्यू प्रिंट मांगवण्यात आली आहे.
युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज
पंतप्रधानांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. यावेळी भारत सीमेवरील रस्त्याचे काम थांबवणार नाही, असा निर्णय झाला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. सीमेवरील चीनसोबतचा तणाव हा सन २०१७ मधील डोकलाम तणातणीनंतरचा सर्वात तीव्र तणाव आहे. त्यावेळचा तणाव पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्या भेटीनंतर तब्बल ७३ दिवसांनी निवळला होता.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा