वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये माजी अध्यक्ष जॉन एफ कनेडी हे 22 नोव्हेंबर 1963 ला त्यांच्या पत्नी जॅकलीन आणि डग्लासचे गव्हर्नर जॉन कोनली यांच्यासोबत एका सभेला संबोधित करण्यासाठी ताफ्यासोबत जात होते. यावेळी दुपारी 12.30 वाजता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हा दिवस अमेरिकेसाठी आणि जगासाठी काळा दिवस होता.
बंदुकीतून झाडलेली एक गोळी केनेडी यांच्या गळ्यातून आरपार गेली होती, तर दुसरी गोळी डोक्याच्या मागील भागाला लागली होती. या हल्ल्यात गव्हर्नरनाही गंभीर दुखापत झाली होती. तातडीने अध्यक्ष केनेडी यांना तेथील पार्कलँड मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवायचे खूप प्रयत्न केले मात्र 1 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अवघ्या 46 व्या वर्षी अमेरिकेचे लोकप्रिय नेते जॉन एफ केनेडी यांनी जगाचा निरोप घेतला. अमेरिकेने तरुण नेता गमावला मात्र या घटनेने जगालाही मोठा हादरा बसला होता. केनेडी यांच्यावर गोळ्या झाडणारा अमेरिकेचा नौदलाचा माजी सैनिकच होता. हार्वे ओस्वाल्ड याला अटक करण्यात आली. केनेडी डेमोक्रेटीक पार्टीचे तर ओस्वाल्ड हा साम्यवादी विचारसरणीचा होता.
खुन्याचीही झाली हत्याहार्वे ओस्वाल्ड याला घटनेच्या दोन दिवसांनंतर 24 नोव्हेंबरला डग्लासच्या काऊंटी जेलमध्ये हलविण्यात येत होते. यावेळी एका नाईट क्लबच्या मालकाने ओस्वाल्डवर गोळ्या झाडल्या आणि ठार केले. जॅक रुबीला 14 मार्च 1964 मध्ये फाशी सुनावण्यात आली. मात्र, ऑक्टोबर 1966 मध्ये टेक्सासच्या न्यायालयाने अपिलामध्ये हा निर्णयच फिरवला होता. मात्र, या प्रकरणात काही घडामोडी घटतील तेवर 3 जानेवरी, 1967 मध्ये रुबी यांचा मृत्यू झाला.
केनेडी यांच्या हत्येनंतर अमेरिकेत मोठे वादळ उठले होते. केनेडी यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे याचा शोध घेणे गरजेचे होते. अमेरिकेच्या उपाध्यक्षांसह क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यानंतर सोव्हियत युनियनवर संशयाची सुई वळली. कॅस्ट्रो यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. तर अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष लिंडन बी जॉनसन यांनी अध्यक्षपदासाठीच केनेडी यांची हत्या केल्याचा आरोप एका सीआयएच्या माजी एजंटने केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार केनेडी यांच्या हत्येची सुपारी सीआयएलाच देण्यात आली होती.