G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 02:01 PM2022-11-15T14:01:43+5:302022-11-15T14:03:16+5:30

G-20 परिषदेत अमेरिकेने रशियाविरोधात प्रस्ताव मांडला, पण अनेक देशांनी विरोध केला.

America stands alone in G-20; Many countries including India opposed 'that' proposal | G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध

G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध

googlenewsNext

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरून जगातील देश दोन भागात विभागले गेले आहेत. याचा प्रत्यय इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या G-20 परिषदेतही पाहायला मिळत आहे. अमेरिका, रशिया, चीन यांसारखे मोठे देशही या शिखर परिषदेत सामील आहेत. या शिखर परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात रशियावर टीका करण्याचा प्रस्ताव पाश्चिमात्य देशांनी ठेवला होता, तो फोल ठरताना दिसत आहे. 

अनेक देशांचा प्रस्तावाला विरोध
भारतासह चीन, रशिया, ब्राझील, सौदी अरेबिया आणि यजमान इंडोनेशियाने या प्रस्तावाचा निषेध केला आहे. रशियाचा निषेध करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक पाश्चिमात्य देशांतून ठराव आणले गेले. सध्या G-20 शिखर परिषदेच्या अंतिम घोषणेबाबत चर्चा सुरू आहे. मात्र भारत, चीन, इंडोनेशिया या देशांनी रशियाला पाठिंबा देताना प्रस्तावाला विरोध केला आहे.

भारतासह अनेक देशांचा रशियाला पाठिंबा
या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. रशियाविरुद्ध अशी निंदनीय आणि कठोर भाषा वापरू नये, असे आवाहन त्यांनी पाश्चात्य देशांना केले आहे. युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याबाबत पाश्चात्य देश आणि भारत, इंडोनेशिया, चीन या आशियाई देशांमध्ये मतभेद आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून सौदी अरेबिया रशियाच्या बाजूने जाताना दिसत आहे. सौदी अरेबियाने रशियासोबत तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर अमेरिकेकडून याला विरोध होत आहे.

पीएम नरेंद्र मोदी काय म्हणाले?
रशियाला अनेक बड्या देशांकडून सातत्याने पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अमेरिकेला आता केवळ युरोपीय देशांचा पाठिंबा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या G20 शिखर परिषदेला उपस्थित नसून, त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आहेत. विशेष म्हणजे आज G-20 शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आले आहे. युक्रेनचा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवावा लागेल, असे ते म्हणाले. 

Web Title: America stands alone in G-20; Many countries including India opposed 'that' proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.