सशस्त्र चोर अथवा दरोडेखोर घरात घुसावा आणि कुणालाही कसल्या प्रकारची हाणी न पोहोचवता घर मालकाला नुकसान भरपाई देऊन निघून जावा. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथे काहीसे असेच घडले आहे. होय, येथे चोर घरात घुसतो, मग तेथेच आंघोळ करतो, खातो-पितो, एवढेच नाही तर दारूही घेतो आणि 15 हजार रुपये सोडून निघून जातो. पण, या चोराच्या अशा कृत्यामागे एक अतिशय रंजक कारण आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कारण...
खरे तर, हा 'प्रामाणिक चोर' न्यू मेक्सिकोतील Santa Fe येथील एका घरात खिडकी तोडून घुसला होता. त्याच्या हातात रायफल होती. तो जेव्हा घरात घुसला, तेव्हा घरातील सदस्य बाहेर गेले होते. मात्र काही तासांनंतर ते परत येईपर्यंत तो तेथेच होता.
चोरानं घरमालकाला दिली नुकसान भरपाई -Albuquerque Journal ने घरमालकाच्या हवाल्याने दिलेल्या माहिती नुसार, एक लुटारू खिडकी तोडून रायफलसह घरात घुसला होता. तो घरातच राहिला, त्याने जेवण घेतले, बियर घेतली आणि झोपला. जेव्हा आम्ही परततो, तेव्हा त्याला घारत बघून आम्हाला गडबडलो. पण, त्याने आम्हाला कसल्याही प्रकारती हाणी पोहोचवली नाही.
घरमालकाच्या म्हणण्याप्रामाणे, हा चोर एवढा सभ्य होता की, त्याने आपल्या कृत्याबद्दल प्रथम कुटुंबीयांची माफी मागितली आणि नंतर काच फोडल्याबद्दल 15 हजार रुपये (200 डॉलर) नुकसान भरपाई म्हणूनही दिले आणि तो परत गेला. महत्वाचे म्हणजे, हे पैसे त्याने तोडलेल्या खिडकीच्या दुरुस्तीसाठी असल्याचेही त्याने कुटुंबीयांना सांगितले.
संबंधित घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने सांगितले की, टेक्सासमध्ये कुणी तरी त्याच्या आई-वडिलांची हत्या केली आहे आणि तो स्वतःच्या बचावासाठी त्यांच्यापासून पळत होता. मात्र याच दरम्यान त्यांची गाडी खराब झाली आणि तो घरात घुसला.