वॉशिंग्टन:भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांकडून भारताला मदत केली जात आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (america vice president kamala harris says we offer our support to india in corona situation)
यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन कार्यक्रमात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी सहभाग नोंदवला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताने कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आमची मदत केली होती आणि आता आम्ही भारताची मदत करण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत, असे त्यांनी नमूद केले.
“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”
शक्य ती सर्व मदत करणार
भारतामध्ये कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढणे हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. तुमच्यापैकी ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत. भारतातील परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे लक्षात येताच अमेरिकेकडून भारताला शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.
सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान
वेगाने लसीकरण करण्यासाठी मदत करणार
भारत आणि अन्य देशांमधील लोकांचे अधिक वेगाने लसीकरण करण्यासाठी मदत करणार असून, आम्ही कोरोना लसींवर असणारा स्वामित्व हक्क संपवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आमचा भारताला संपूर्ण पाठिंबा असल्याचे कमला हॅरिस यांनी स्पष्ट केले.
लंडनमधील क्वारंटाइन काळात एस. जयशंकर यांना वेटरसारखे कपडे!; भाजप खासदाराचा दावा
दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने आणि नागरिकांनी भारतासाठी मदतीची पहिली खेप पाठवली. आम्ही रिफिल करता येतील, असे ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, एन ९५ मास्क दिले आहेत. आम्ही अजून मास्क पाठवण्यासाठी तयार आहोत. रेमेडिसविर औषधांचा साठाही आम्ही भारतामध्ये पाठवला आहे, अशी माहिती कमला हॅरिस यांनी यावेळी दिली.