अमेरिकेला युक्रेनमधील हवा आहे 'हा' खजिना; पण त्यावर रशियाचे आहे आधीपासूनच नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:12 IST2025-02-04T19:10:44+5:302025-02-04T19:12:46+5:30
अमेरिकेत आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली आहे.

अमेरिकेला युक्रेनमधील हवा आहे 'हा' खजिना; पण त्यावर रशियाचे आहे आधीपासूनच नियंत्रण
अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. सत्तेवर येताच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात मदतीच्या बदल्यात खनिजची मागणी केली आहे. सोमवारी त्यांनी याबाबत संकेत दिले, यामध्ये त्यांनी अमेरिकेचे समर्थन फक्त एका अटीवर मिळेल. युक्रेनमध्ये मिळत असलेल्या खनिजाबाबत एक करार करावा लागेल. या करारा अंतर्गत अमेरिकेला खनिज पुरवावे लागेल, असे संकेत दिले.
Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा
युक्रेनमध्ये मिळणारे खनिज कोणत्या खजिनापेक्षा कमी नाही. कारण याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य गोष्टी बनवण्यासाठी वापरल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनमधील जे खनिज हवे आहे, त्या खनिजाच्या ७० टक्के भागावर रशियाचे नियंत्रण आहे.
वर्ष २०२३ मध्ये फोर्ब्सने एका अहवालात या खनिजाचे मुल्य १५ ट्रिलियन डॉलर असल्याचे सांगितले होते. यामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त तीन प्रदेशांमध्ये आहेत - डोनेस्तक, लुहान्स्क आणि निप्रोपेट्रोव्हस्क. खनिजांच्या एकूण मूल्यापैकी कोळशाचा वाटा ६२ टक्के, लोहखनिजाचा वाटा १४ टक्के आणि उर्वरित मालमत्ता ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकूण खनिजांचे प्रमाण १११ अब्ज टन असल्याचा अंदाज आहे. सध्या या भागातील बहुतेक भाग रशियाच्या ताब्यात आहेत. आता युद्ध संपण्यापूर्वी युक्रेनला हे प्रदेश परत मिळवणे महत्त्वाचे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, अमेरिकेने युक्रेनला त्यांच्या युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा खूप जास्त लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे. आम्हाला युक्रेनशी एक करार करायचा आहे ज्याअंतर्गत आम्ही त्यांना जे काही देत आहोत त्या बदल्यात ते आम्हाला त्यांचे दुर्मिळ खनिजे देतील. यावेळी ट्रम्प यांनी हा संदेश युक्रेनकडून आल्याचे सुचवले. आधुनिक उच्च तंत्रज्ञानाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या घटकांपर्यंत अमेरिकेला प्रवेश देण्यासाठी करार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मला पृथ्वीवर आढळणाऱ्या या दुर्मिळ खनिजांचे जतन करायचे आहे. आपण शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करत आहोत. त्यांच्याकडे काही खरोखरच दुर्मिळ खनिजे आहेत आणि मला ही दुर्मिळ खनिजे जतन करायची आहेत. ते ते करण्यास तयार आहेत.
या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियातील युद्ध लवकर संपवतील आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे, असं म्हणाले होते. 'आम्ही रशिया आणि युक्रेनवर खूप प्रगती केली आहे. बघूया काय होते ते. आम्ही हे युद्ध थांबवणार आहोत, असंही ट्रम्प म्हणाले होते.