शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 2:35 PM

व्हाईट हाउसवर ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या प्रकरण...

America White House: अमेरिकेत एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाला राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाउसवर ट्रक चढवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाने व्हाईट हाऊसजवळील बॅरिकेडींवर ट्रक चढवला. आरोपीचे नाव साई वर्षित कंदुला आहे. त्याने काही आक्षेपार्ह विधानंही केली आहेत, ज्यावरुन त्याचा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना इजा करण्याचा त्यांचा हेतू होता, असे दिसते.

पीटीआयने मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाने सांगितले की त्याला बायडन यांना मारायचे आहे. तो भाड्याच्या ट्रकने व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने ट्रक लाफायेट पार्कच्या उत्तरेकडील सुरक्षा बॅरिकेडींगवर चढवला. ही घटना सकाळी दहाच्या सूमारास घडली.

व्हाईट हाऊसच्या गेटजवळ ही घटना घडली. यामुळे जवळचे हॉटेल रिकामे करावे लागले. ट्रक धडकला तेव्हा लोक इकडे तिकडे धावू लागले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आरोपी साई कंदुला अमेरिकेतील मिसुरी राज्यातील चेस्टरफिल्ड येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री त्याने ट्रक भाड्याने घेतला होता. 

पकडल्यानंतर आरोपी काय म्हणाला?अटकेनंतर आरोपीने अधिकाऱ्यांना सांगितले की, तो गेल्या सहा महिन्यांपासून हल्ल्याचा कट रचत होता. व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करणे, सत्ता काबीज करणे आणि देशाचा कारभार हाती घेणे, असा त्याचा हेतू होता. अधिकार्‍यांनी विचारले की, तुला सत्ते कशी मिळेल, त्यावर तो म्हणाला, मी राष्ट्राध्यक्षाला मारेन आणि माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला इजा पोहचवेन. तपास यंत्रणा एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मानसिक आरोग्याच्या अँगलने तपास होणार आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय