वॉशिंग्टनः चीन सातत्यानं आक्रमक भूमिका घेत असल्यानं अमेरिकाही सतर्क झाला आहे. तसेच चीन गेल्या काही दिवसांपासून रशियाबरोबर मैत्री वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे जिनपिंग अन् पुतिन मिळून एक घातक शस्त्र तयार करत असल्याचीही माहिती समोर आली होती. त्यामुळे नाटो देशांची चिंता वाढली होती. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने असे म्हटले आहे की, बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पूर्व आशियाई आणि पॅसिफिक प्रकरणाचे सहाय्यक सचिव डेव्हिड आर. स्टिलवेल म्हणाले की, दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्याचा थेट परिणाम आर्क्टिक, हिंदी महासागर, भूमध्य आणि इतर महत्त्वाच्या जलमार्गांवर होतो. दक्षिण चीन समुद्रातील धोक्याचा थेट परिणाम समुद्राच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक राष्ट्र आणि व्यक्तीवर होत असतो. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पूर्व आशियाई आणि पॅसिफिक प्रकरणाचे सहाय्यक सचिव डेव्हिड आर. स्टेलवेल म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत जगाने कोरोनाविरोधातल्या लढाईवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्याचदरम्यान चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनानं दक्षिण चीन समुद्रातील आपल्या हालचाली अधिक वेगवान केल्या आहेत. त्यांना वाटतं ते बरोबर करत आहेत, पण याचे त्यांना परिणाम भोगावे लागू शकतात, असंही डेव्हिड आर. स्टेलवेल यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना
बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी
धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा
देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट