ढाका : धार्मिक कट्टरवादाविरुद्ध बोलणारे अशी ओळख असलेल्या प्रमुख बांगलादेशी अमेरिकी ब्लॉगरची चॉपरचे (मांस कापण्यासाठीचा मोठा सुरा) वार करून हत्या करण्यात आली. बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. अविजित रॉय असे या ब्लॉगरचे नाव असून ते बांगलादेशी वंशाचे अमेरिकी नागरिक होते. ते पत्नी रफिदा अहमदसह ढाका विद्यापीठात आयोजित पुस्तक मेळाव्याला गेले होते. परतत असताना पदपथावर या दाम्पत्यावर हल्ला झाला. रॉय हे ठार झाले, तर त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या. त्याही ब्लॉगर आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले नाही. रॉय हे धार्मिक कट्टरवादाविरुद्ध आक्रमकपणे आवाज उठवत होते. त्यांच्या लिखाणाबद्दल यापूर्वीही त्यांना धमक्या मिळाल्या होत्या, असे त्यांचे मित्र व कुटुंबियांनी सांगितले. रॉय यांनी बंगाली भाषेतील मुक्तो मोना अर्थात मुक्त मन हा ब्लॉग सुरू केला होता. तो खूप लोकप्रिय ठरला.
अमेरिकी ब्लॉगरची बांगलादेशात हत्या
By admin | Published: February 28, 2015 12:40 AM