George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:28 PM2023-02-17T13:28:40+5:302023-02-17T13:29:50+5:30

अदानी प्रकरणामुळे मोदींची भारतावरील पकड सैल झाली, असे विधान सोरोस यांनी केले होते.

American businessman George Soros attack Pm Modi over Gautam Adani issue bjp smriti irani congress slams foreign power | George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार

George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार

googlenewsNext

George Soros vs Pm Modi, Smriti Irani: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार प्रहार केला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, परकीय भूमीतून भारतीय लोकशाही रचनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जॉर्ज सोरोस यांनी भारताच्या लोकशाहीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असून पंतप्रधान मोदी त्यांचे लक्ष्य आहेत. आज देशातील जनतेने भारतीय म्हणून एकत्रित येऊन या परकीय सत्तेला दणका दिला पाहिजे, असे इराणी म्हणाल्या. तर, दुसरीकडे काँग्रेसनेही या मुद्द्यावरून जॉर्ज सोरोस यांना लक्ष्य केले.

जॉर्ज सोरोस यांनी अलीकडेच अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, मोदी या मुद्द्यावर शांत आहेत. पण असे चालणार नाही. त्यांना परकीय गुंतवणूकदारांना आणि संसदेत प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. म्युनिक सुरक्षा परिषदेत सोरोस बोलत होते. तेव्हा म्हणाले की यामुळे भारताच्या फेडरल सरकारवरील मोदींची पकड लक्षणीयरीत्या कमकुवत होईल आणि अत्यंत आवश्यक संस्थात्मक सुधारणांचा पाठपुरावा करण्याचे दरवाजे उघडतील. तसेच, आशा आहे की भारतात लोकशाही बदल होईल, असेही सोरोस म्हणाले होते.

स्मृती इराणींनी केली सोरोस यांच्यावर टीका

स्मृती इराणींनी जॉर्ज सोरोस यांच्यावर ताशेरे ओढले की, बँक ऑफ इंग्लंड फोडणाऱ्या, आर्थिक युद्धातील दोषी म्हणून नावाजलेल्या व्यक्तीने आता भारतीय लोकशाही तोडण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींना आपल्या अजेंड्याचा मुख्य मुद्दा करणार असल्याचे त्यांनी यातून जणू काही जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या परकीय सत्तेखाली भारतात अशी व्यवस्था निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे, जी भारताचे नव्हे तर त्यांच्या हिताचे रक्षण करेल, असा टोला इराणींनी लगावला.

"आज एक नागरिक या नात्याने मी देशातील जनतेला आवाहन करू इच्छिते की, एक परकीय शक्ती आहे ज्याच्या केंद्रस्थानी जॉर्ज सोरोस नावाचा माणूस आहे. भारताच्या लोकशाही रचनेला धक्का पोहोचवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आज आपण जॉर्ज सोरोस यांना एकजुचीने उत्तर दिले पाहिजे की लोकशाही परिस्थितीत लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आणि आपले पंतप्रधान अशा चुकीच्या दबावापुढे झुकणार नाहीत. भूतकाळातही आम्ही परकीय शक्तींचा पराभव केला आहे, भविष्यातही त्यांचा पराभव करू", असे विश्वास इराणींनी व्यक्त केला.

काँग्रेसनेही सोरोसचा खरपूस समाचार घेतला

दुसरीकडे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही या मुद्द्यावरून जॉर्ज सोरोस यांना फटकारले आहे. ते म्हणाले, "पंतप्रधानांचा समावेश अदानी घोटाळ्यात आहे की नाही, त्यामुळे भारतात लोकशाही पुनरुत्थान सुरू होते की नाही, हे सर्वस्वी काँग्रेस, विरोधी पक्ष आणि आमच्या निवडणूक प्रक्रियेवर अवलंबून आहे. त्याचा जॉर्ज सोरोसशी काहीही संबंध नाही. आमचा नेहरूवादी वारसा हे सुनिश्चित करतो की त्यांच्यासारखे लोक आमचे निवडणूक निकाल ठरवू शकत नाहीत."

Web Title: American businessman George Soros attack Pm Modi over Gautam Adani issue bjp smriti irani congress slams foreign power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.