वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एच-१बी व्हिसावर बंधने आणण्यासाठी पावले उचलली असतानाच या व्हिसामुळे अमेरिकी नागरिकांचे कल्याणच झाल्याचा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात आला आहे. अमेरिकी आयटी व्यावसायिकांना मात्र या व्हिसाचा फटका बसल्याचे अभ्यासात समोर आले आहे.भारतीय आयटी व्यावसायिकांत एच-१बी व्हिसाला सर्वाधिक मागणी आहे. या व्हिसामुळे अमेरिकी कंपन्यांना विदेशी मनुष्यबळ हंगामी स्वरूपात कामावर ठेवता येते. या व्हिसाच्या संख्येवर आता अमेरिकी सरकारने मर्यादा घातली असून, व्हिसाचे नियमही कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत.अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील जॉन बाउंड आणि निकोलस मोरालेस यांनी या वादग्रस्त व्हिसाचा नुकताच परिपूर्ण अभ्यास केला. कॅलिफोर्नियाच्या सॅन दिअॅगो विद्यापीठाचे गौरव खन्ना हेही या अभ्यासात सहभागी होते. विदेशी संगणक शास्त्रज्ञांचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा त्यांनी प्रामुख्याने अभ्यास केला. १९९४ ते २00१ या कालावधीची त्यांनी अभ्यासासाठी निवड केली. या अभ्यासात असे आढळून आले की, विदेशी संगणक शास्त्रज्ञांमुळे या क्षेत्रातील नावीन्य वाढले. अमेरिकेतील आयटी कंपन्यांची नफा क्षमता वाढली. अमेरिकेच्या नागरिकांच्या कल्याणात भर पडली. आयटी उत्पादनांच्या किमती कमी झाल्या. तसेच उत्पादन १.९ टक्के ते २.५ टक्के वाढले. त्याचा थेट ग्राहकांनाच फायदा झाला. (वृत्तसंस्था)काही लोक अन्य व्यवसायाकडे वळलेअमेरिकी आयटी व्यावसायिकांवर मात्र याचा वाईट परिणाम झाल्याचे अभ्यासात दिसून आले. मोरालेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी संगणक शास्त्रज्ञांना अन्य व्यवसायाकडे वळावे लागले. त्यांच्या रोजगारावर ६.१ टक्के ते १0.८ टक्के परिणाम झाला. त्यांचे वेतनही २.६ टक्के ते ५.१ टक्क्यांनी कमी झाले.
अमेरिकी कंपन्या, ग्राहकांचे कल्याण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 5:04 AM