लॉस एंजल्स : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या स्थलांतर अधिकाऱ्यांनी किंगखानला अडविण्याची सात वर्षांतील ही तिसरी वेळ आहे. शाहरूखने याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. लॉस एंजल्स येथील विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याबद्दल शाहरूखने टिष्ट्वट केले की, जगातील सध्याची परिस्थिती पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे योग्य असून, मी त्याचा आदरही करतो; मात्र अमेरिकन स्थलांतर विभागाने दरवेळी ताब्यात घेणे हैराण करणारे आहे. शाहरूखने दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, याची जमेची बाजू म्हणजे प्रतीक्षा काळात अनेक चांगले ‘पोकेमॉन’ मिळाले. पुन्हा अशी वेळ येणार नाही अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असे घडू नये यासाठी सरकार उपाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्मा यांच्या टिष्ट्वटरवरील प्रतिक्रियेची शाहरूखने प्रशंसा करत आपुलकीबद्दल आभार मानले आहेत. तुमच्या कामातून अमेरिकेतील लोकांसह लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. शाहरूखने म्हटले. सर काहीही त्रास नाही, मी शिष्टाचाराचा आदर करतो आणि स्वत:ला त्याहून मोठा समजत नाही. यामुळे नंतर थोडी गैरसोय झाली एवढेच. (वृत्तसंस्था)याआधीही असेच काही..2012 मध्ये एप्रिल महिन्यात अधिकाऱ्यांनी शाहरूखची न्यूयॉर्कजवळील व्हाइट प्लेन्स विमानतळावर ९० मिनिटे चौकशी केली होती.2009मध्ये शाहरूखला नेवार्क विमानतळावर दोन तास थांबवून तपासणी करण्यात आली होती. अमजद अलींना व्हिसा नाहीसरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना ब्रिटनचा व्हिसा नाकारण्यात आला. ते लंडन येथे कार्यक्रमासाठी पुढील महिन्यात जाणार होते. गेल्या चार दशकांपासून ते परदेशांमध्ये मैफली करत आहेत. पण व्हिसा नाकारला जाण्याची त्यांच्यावर ही पहिलीच वेळ आहे. तुम्हाला विमानतळावर झालेल्या त्रासाबद्दल खेद आहे; मात्र अतिरिक्त तपासणी हा सुरक्षेचा एक पैलू असून, अगदी अमेरिकन मुत्सद्दीही यातून सुटत नाहीत.- निशा देसाई बिस्वाल, दक्षिण आणि मध्य आशियाच्या सहायक मंत्री, अमेरिका
अमेरिकी विमानतळावर ‘डॉन’ला पुन्हा रोखले!
By admin | Published: August 13, 2016 6:02 AM