वॉशिंग्टन : वादग्रस्त दक्षिण चीन सागरावर अमेरिकेच्या बॉम्बफेक करणाऱ्या एका बी-२ या विमानाने उड्डाण करताना आढळले आहे. या घटनेनंतर चीनने अमेरिकेकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.दक्षिण चीन सागरावर चीन आपला दावा करीत असून त्याला जपान, व्हिएतनामसह अनेक देशांनी विरोध केला आहे. त्यामुळे या भागात तणाव पसरला असून त्यांच्या बाजूने अमेरिका उभी राहिली आहे. दक्षिणे चीन सागरात चीनच्या कृत्रिम बेटानजीक आपल्या बी-२ या बॉम्बफेक करणाऱ्या विमानांनी चुकीने उड्डाण केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे पेंटॅगॉनतर्फे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात अमेरिकेची दोन बी-२ ही विमाने नियमित अभियानावर असताना ही घटना घडली होती.
दक्षिण चीन सागरावर अमेरिकी विमानाचे उड्डाण
By admin | Published: December 20, 2015 12:04 AM