नवी दिल्ली: अमेरिकेनं आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीविरोधात अमेरिकेनं मोठी कारवाई सुरू केल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलं आहे. याच वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडलंय, असं ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे बगदादीचा खात्मा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या घोषणेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आलं होतं.