वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारी व्यक्ती अस्तित्वातच नाही; परंतु ती इटलीची कादंबरीकार असल्याचे समोर आले आहे. ही दुहेरी भूमिका गेल्या आठ महिन्यांपासून साकारणारी व्यक्ती अलेसँड्रो नार्दोन (३९) असून त्याने अलेक्स अँडरसन असे नाव आॅनलाईनवर प्रचारासाठी घेतले होते. कॅलिफोर्नियाचा काँग्रेसमन म्हणून अँडरसनने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर छाप पाडली होती. रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असल्याचे अलेसँड्रो आॅनलाईन सांगत होता. आपण खरेखुरे अलेक्स अँडरसन नसल्याचे त्याने स्वत:च जाहीर केल्यानंतरही प्रचारासाठीची बनावट वेबसाईट (संकेतस्थळ) आणि टिष्ट्वटर अकाऊंट तो चालूच ठेवणार आहे, कारण त्या दोन्हींवर त्याला अनेक अमेरिकन चाहते लाभले आहेत, असे त्याने सांगितले.अलेसँड्रो नार्दोन म्हणाला की, ‘‘मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी झोपायला जातो त्यावेळी अमेरिका जागी होत असते. मी माझ्या कॉम्प्युटरसमोर बसतो आणि अलेक्स अँडरसनचे आयुष्य जगू लागतो. क्लार्क केंट हा जसा टेलिफोन बुथवर जाऊन सुपरमॅन बनायचा तसेच हे होते.’’ अलेसँड्रो नार्दोन हा मार्केटिंग कन्सल्टंट व उत्तर इटलीतील स्थानिक माजी राजकारणी आहे. फावल्या वेळेत तो कादंबऱ्याही लिहितो.नार्दोन व त्याच्या मित्रांच्या गटाने अलेक्स अँडरसन याला पाठिंबा मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर (अेी१्रूं्र२ल्लङ्म६) २६,४०० फालोअर्स, तर दोन लाखांपेक्षा जास्त व्हिजिटर्सनी त्याच्या या बनावट प्रचार संकेतस्थळाला क्लिक केले आहे. अँडरसनचे प्रचाराचे संकेतस्थळ हे प्रारंभी तुम्हाला त्याची भूमिका पटविण्यात यशस्वी ठरते. अँडरसनला अमेरिकेतून चर्चेसाठी अनेक निमंत्रणे आली व प्रसारमाध्यमांना मुलाखती द्या, असेही म्हटले गेले. (वृत्तसंस्था)
अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2016 3:21 AM