इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एक अमेरिकन ब्लॉगर सिंथिया डी रिची यांनी (Cynthia D. Ritchie) पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. रिची यांनी शुक्रवारी आपल्या फेसबूक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून हे आरोप केले आहेत. त्यांची ही पोस्ट तत्काळ सोशल मिडियावर व्हायरल झाली. रिची यांनी दावा केला, की ‘2011मध्ये माजी गृहमंत्री रहेमान मलिक यांनी त्यांच्यावर बलात्कार केला.
याशिवाय, माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि माजी आरोग्यमंत्री मखदूम शहाबुद्दीन यांनीही आपला विनयभंग केला. तेव्हा गिलानी इस्लामाबादच्या राष्ट्रपती भवनात राहात होते, असा आरोपही रिची यांनी केला आहे.
निर्दयतेचा कळस : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना हिमाचलमध्ये; गाईला खायला दिली स्फोटकं
रिची यांच्या फेसबूक पोस्टनंतर पीपीपी आणि त्यांच्यात आधिच खराब असलेले संबंध आणखी बिघडले आहेत. यापूर्वी 28 मेरोजी एका ट्विटमधूल रिची यांनी गिलानी आणि दिवंगत नेते बेनजीर भुट्टो यांच्यावरही टीका केली होती. याविरोधात पक्षाने एफआयएमध्ये त्यांच्यावर मानहानिचा गुन्हाही दाखल केला आहे.
CoronaVirus News: दिलासादायक! एम्सच्या अभ्यासात HCQ प्रभावी; '2-3 महिन्यात तयार होईल कोरोनावरील औषध'
आणखी एका पोस्टमध्ये रिची म्हणाल्या, 2011मध्ये मलिक यांच्या घरात ‘मिनिस्टर्स एन्क्लेव्ह’मध्ये त्यांच्यावर अत्याचार झाला. याच वेळी अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानात एका छाप्यात मारला गेला होता. त्या म्हणाल्या, ‘मला वाटले होते, तेथे माझ्या व्हिसासंदर्भात बैठक आहे. मात्र, तेथे मला फूल आणि ड्रिंक देण्यात आले. पण, ’त्या त्यावेळी शांत राहिल्या कारण त्यांना तत्कालीन पीपीपी सरकारमधून कुणाचीही मदत मिळाली नाही. यासंदर्भात, त्यांनी तेव्हाच पाकिस्तानातील अमेरिकन दुतावासातील कुणाला तरी माहिती दिल्याचेही म्हटले आहे.
आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक; मुंज-लग्नासह नऊ दिवस सुरू होता सोहळा!
गिलानी यांनी आरोप फेटाळले - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्यांच्यावर झालेला विनयभंगाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपण, अशा प्रकारच्या आरोपांवर उत्तर देण्याचा विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया
रिची यांच्या मुलांविरोधात दाखल झाला होता मानहाणीचा गुन्हा -एआरवाय न्यूज शी बोलताना गिलानी म्हणाले, रिची नेत्यांची छबी खराब करण्यासाठीच पाकिस्तानात आल्या होत्या. त्यांनी प्रश्न केला, “राजकारण्यांवर अशा पद्धतीचे आरोप करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला?” तसेच, रिची यांच्या दोन्ही मुलांवर भुट्टोंवर कथित अपमानास्पद ट्वीट केल्यावरून मानहानीचा गुन्हा दाखल आहे. यामुळे त्या माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करत आहेत, असेही गिलानी म्हणाले. मात्र अद्याप, इतर दोन मंत्र्यांनी यासंदर्भात कसल्याही स्वरुपाचे भाष्य केलेले नाही.