युक्रेनमध्ये लढाईसाठी भरती होताहेत अमेरिकन; आतापर्यंत १०० जण आले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:03 AM2022-03-11T06:03:58+5:302022-03-11T06:04:43+5:30
दूतावासाबाहेर जॉर्जटाऊनच्या एका भागात करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनसाठी लढण्यासाठी स्वयंसवेकांकडून प्रस्ताव मिळत आहेत.
वॉशिंग्टन : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाने वॉशिंग्टनस्थित युक्रेनच्या दूतावासाला एक अनपेक्षित भूमिका मिळाली आहे. आहे. युक्रेनमधील लढाईत सामील होण्यास इच्छुक असलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी भरती केंद्र अशी ही भूमिका आहे.
दूतावासाबाहेर जॉर्जटाऊनच्या एका भागात करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनसाठी लढण्यासाठी स्वयंसवेकांकडून प्रस्ताव मिळत आहेत.
युक्रेन दूतावासाशी संबंधित लष्करी राजदूत सहायक मेजर जनरल बोरिस क्रेमेनत्सकी यांनी सांगितले की, त्यांना वाटते की युद्ध अनुचित आणि बेसबब आहे. तेथे जाऊन मदत करावी, असेही त्यांना वाटते. अमेरिकेचे हे स्वयंसेवक युक्रेनसाठी लढाई करण्यास इच्छुक असलेल्या विदेशींच्या एका छोट्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात. सोशल मीडियाच्या दुनियेतही हल्ले आणि यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूबाबत या लोकांची चिंता आणि तळमळ प्रतित होते.
मेजर जनरल बोरिस क्रेमेनत्सकी यांनी म्हटले की, हे पैसा कमाविणारे अतिरेकी नाही. ते चांगले लोक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यााठी युक्रेनची मदत करण्यासाठी ते येत आहेत. तथापि, अमेरिका सरकार आपल्या नागरिकांना युक्रेनमध्ये जाऊन लढाईसाठी प्रेरित करीत नाही; कारण यामुळे कायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न उपस्थित होतात. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर २४ फेब्रुवारीपासूनच वॉशिंग्टनस्थित दूतावासात सहा हजार लोकांनी चौकशी केली. यात बव्हंशी अमेरिकन आहेत. लष्करातील पुरेसा अनुभव नसल्याने निम्म्या स्वयंसेवकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. आतापर्यंत १०० अमेरिकी नागरिकांची भरती करण्यात आली आहे. यात इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धाचे अनुभव असलेल्या माजी सैनिकांचा समावेश आहे.
असा कसा देश आहे रशिया - जेलेन्स्की
n युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्सकी यांनी टीव्हीवरून केलेल्या भाषणात सांगितले की, मारियुपोल हल्ल्यात मुले आणि अन्य ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
n असा कसा देश आहे रशिया, जो बाल रुग्णालय, प्रसूतिगृहालाही घाबरतो आणि ही इस्पितळे उद्ध्वस्त करतो. पाश्चिमात्य देशांनी रशियाविरुद्ध आणखी कठोर निर्बध लागू करावेत. जेणेकरून अशा प्रकारचा नरसंहार सुरू ठेवण्याची शक्यता राहणार नाही.