शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

युक्रेनमध्ये लढाईसाठी भरती होताहेत अमेरिकन; आतापर्यंत १००  जण आले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 6:03 AM

दूतावासाबाहेर जॉर्जटाऊनच्या एका भागात करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनसाठी लढण्यासाठी स्वयंसवेकांकडून प्रस्ताव मिळत आहेत.

वॉशिंग्टन :  रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाने वॉशिंग्टनस्थित  युक्रेनच्या दूतावासाला  एक अनपेक्षित भूमिका मिळाली आहे. आहे. युक्रेनमधील लढाईत सामील होण्यास इच्छुक असलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी भरती केंद्र अशी ही भूमिका आहे.

दूतावासाबाहेर जॉर्जटाऊनच्या एका भागात करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनसाठी लढण्यासाठी स्वयंसवेकांकडून प्रस्ताव मिळत आहेत.युक्रेन दूतावासाशी संबंधित लष्करी राजदूत सहायक मेजर जनरल बोरिस क्रेमेनत्सकी यांनी सांगितले की,  त्यांना वाटते की युद्ध अनुचित आणि बेसबब आहे. तेथे जाऊन मदत करावी, असेही त्यांना वाटते. अमेरिकेचे हे स्वयंसेवक युक्रेनसाठी लढाई करण्यास इच्छुक असलेल्या विदेशींच्या एका छोट्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात. सोशल मीडियाच्या दुनियेतही हल्ले आणि यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूबाबत या लोकांची  चिंता आणि  तळमळ प्रतित होते.

मेजर जनरल बोरिस क्रेमेनत्सकी यांनी म्हटले की, हे पैसा कमाविणारे अतिरेकी नाही. ते चांगले लोक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यााठी युक्रेनची मदत करण्यासाठी ते येत आहेत.  तथापि, अमेरिका सरकार आपल्या नागरिकांना युक्रेनमध्ये  जाऊन लढाईसाठी प्रेरित करीत नाही; कारण यामुळे कायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न उपस्थित होतात. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर २४ फेब्रुवारीपासूनच वॉशिंग्टनस्थित दूतावासात सहा हजार लोकांनी चौकशी केली. यात बव्हंशी अमेरिकन आहेत. लष्करातील पुरेसा अनुभव नसल्याने निम्म्या स्वयंसेवकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. आतापर्यंत १०० अमेरिकी नागरिकांची भरती करण्यात आली आहे. यात इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धाचे अनुभव असलेल्या माजी सैनिकांचा समावेश आहे.

असा कसा देश आहे रशिया - जेलेन्स्कीn    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्सकी  यांनी टीव्हीवरून केलेल्या भाषणात सांगितले की, मारियुपोल हल्ल्यात मुले आणि अन्य ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.n    असा कसा देश आहे रशिया, जो  बाल रुग्णालय, प्रसूतिगृहालाही घाबरतो आणि ही इस्पितळे उद्ध्वस्त करतो. पाश्चिमात्य देशांनी रशियाविरुद्ध आणखी कठोर निर्बध लागू करावेत. जेणेकरून अशा प्रकारचा नरसंहार सुरू ठेवण्याची शक्यता राहणार नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया