शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

पाकिस्तानमध्ये एवढं मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 9:21 AM

पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकेने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे.

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. अमेरिकन दूतावास आणि पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी आपल्या नागरिकांना ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर अमेरिकन सरकारने आपल्या नागरिकांना कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. ॲडव्हायजरीत पुढे म्हटले आहे की, अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाबाबत जागरूक असले पाहिजे.

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद १५-१६ ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाईल. कराची आणि इस्लामाबादमध्ये सुरक्षा राखण्यासाठी शाहबाज सरकारने शहरात लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्त्रायलने हिजबुल्लाह आणि हमासवर केलेल्या हल्ल्याबाबतही पाकिस्तानात निदर्शने होत आहेत. दहशतवादी संघटना आपल्या नागरिकांना लक्ष्य करू शकतात याची अमेरिकेला चिंता आहे.

हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर हिजबुल्लाहचा नवा प्रमुख हाशेम सैफुद्दीन हा सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. सैफुद्दीनला मारण्यासाठी इस्रायलने दक्षिण बेरूतमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.

दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास २७ सप्टेंबर रोजी इस्रायलने बेरूतसह हिजबुल्लाहच्या सर्व ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यावेळी इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने दावा करण्यात आली की, त्यांनी हिजबुल्लाह संघटना जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली आहे. हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र साठा नष्ट करण्याचा दावाही इस्रायलने केला आहे. यानंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि त्याची मुलगी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची बातमी समोर आली. याबाबत हिजबुल्लाहकडून दुजोरा देण्यात आला नव्हता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलIranइराण