शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘आप’च्या विजयावर अमेरिकेचे नो कॉमेंट

By admin | Published: February 12, 2015 12:01 AM

मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या पराभवावर चहूकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.

वॉशिंग्टन : मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या पराभवावर चहूकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. अमेरिकन अधिका-यांनी मात्र या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले; पण अमेरिकेतील प्रसारमाध्यमे मात्र आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असून, न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये ‘आप’चा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, असे स्पष्ट म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी राजकीय उंची गाठली; पण घरगुती राजकारणात मात्र त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली, असे या संपादकीय लेखात न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. गेल्यावर्षी मोदी लाटेमुळे भाजपने संपूर्ण देशात आपला प्रभाव जमविला होता. यामुळे मोदी व भाजपचे नेते यांच्याभोवती वलय तयार झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्याने अपराजित अशी प्रतिमा निर्माण करण्यातही भाजपला यश मिळाले; पण भाजपची ही यशस्वी घोडदौड ‘आप’ने तितकाच प्रभावी विजय मिळवून रोखली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी मात्र दिल्ली निवडणूक हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत चर्चा गुंडाळली. (वृत्तसंस्था)